Soybean Disease agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Disease : सोयाबीनवरील अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘कृषी विभागाकडून’कडून मार्गदर्शन

Shirol Agriculture : शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांमध्येही पाने खाणाऱ्या अळींचा बंदोबस्त करण्यासाठी फवारणीबाबत माहिती देण्यात येणार आहे.

sandeep Shirguppe

Department of Agriculture Shirol : सोयाबीन पिकावर पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. याबाबत तालुका कृषी विभागाने बुधवारी (ता. ७) जयसिंगपूरमधील सोयाबीन शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

शिरोळ तालुक्यात एकीकडे महापुराचा फटका बसत असताना दुसरीकडे शिल्लक असलेल्या सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. शिरोळ येथे तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकाने जयसिंगपूर येथे सोयाबीनच्या प्लॉटची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. शिवाय याबाबत कृषी सहायकांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांमध्येही पाने खाणाऱ्या अळींचा बंदोबस्त करण्यासाठी फवारणीबाबत माहिती देण्यात येणार आहे.

तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे-पाटील, कृषी मंडल अधिकारी दत्तात्रय आवारे, उदगावच्या कृषी सहायक स्वाती माळी यांच्यासह पथकाने सोयाबीन प्लॉटची पाहणी केली. शेतकऱ्यांना या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी लागणाऱ्या औषधाची माहिती देऊन फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

माळभागावर सोयाबीन चांगला आला असून आता फुलकळी आणि शेंगा लागत आहेत. अशात पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी करून अळीचा बंदोबस्त करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे-पाटील यांनी केले आहे.

पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे काय आहेत?

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरांजवळ विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात. त्यानंतर पाने जशी परिपक्व होत जातात तशी त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात.

काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. दाण्यामधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो. विषाणूचा प्रसार मुख्यतः पांढरी माशी या किटकाद्वारे होतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT