Latur News : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेती व्यवसाय केला तर कमीत कमी वेळेत जास्त काम होते. हे शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या वतीने महापूर (ता. लातूर) शिवारात ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. प्रात्यक्षिकात पाच एकरांवरील सोयाबीन फवारणी अवघ्या दोन तासांतच उरकली.
कृषी महाविद्यालय, एडीएम अॅग्रो व कोरोमंडल इंटरनॅशनलच्या वतीने सोमवारी (ता. ५) हा उपक्रम राबविण्यात आला.
गेल्या काही वर्षांत शेती व्यवसायात अनेक नवीन तंत्रज्ञान आले आहेत. त्याचा अवलंब केला तर उत्पादन खर्च कमी होऊन शेती फायद्याची ठरेल. ड्रोन तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. ज्योती देशमुख व डॉ. नितीन तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धरामेश्वर पाटील, राहुल पवार, राज कुमार, पीयूष बनिया, शांती स्वरूप, वैष्णवी नाईकनवरे, स्नेहल सपाटे, सृष्टी जाधव, प्रियंका शिंदे, रिचा भारती, मनीषा राठोड, शुभदा शिराळ, तृप्ती सावंत, प्रियंका पवार या कृषिदूत व कृषिकन्यांनी प्रात्यक्षिकासाठी पुढाकार घेतला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.