Sharad Pawar Inspire Fellowship : ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’साठी करा अर्ज

Fellowship Update : शेतीमधील विविध समस्यांवर उपाय शोधणाऱ्या कृषी पदवीधरांसह साहित्य व शिक्षण क्षेत्रात ठसा उमटवू बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Pune News : शेतीमधील विविध समस्यांवर उपाय शोधणाऱ्या कृषी पदवीधरांसह साहित्य व शिक्षण क्षेत्रात ठसा उमटवू बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सहा दशकांच्या सार्वजनिक जीवनात शेती, सामाजिक न्याय, शिक्षण, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक काम केले आहे. त्यांच्या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’ने राज्यातील विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा उपक्रम तीन वर्षांपूर्वी सुरू केला.

Sharad Pawar
Sharad Pawar on Milk Price : दूध उत्पादकांच्या प्रश्नामध्ये आता शरद पवार लक्ष घालणार

या वर्षी ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रिकल्चर’साठी ८० जणांची, ‘शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप’साठी १२; तर ‘शरद पवार इन्स्पायर शिक्षण फेलोशिप’साठी ३० अशा एकूण १२२ जणांची निवड केली जाणार आहे.

Sharad Pawar
MSP Guarantee: राज्यात हमीभाव खरेदीची मागणी का जोर धरू लागली?

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात व रोजगार संधीत वाढ होण्यासाठी कृषी क्षेत्रातील नव्या स्टार्टअप्सला बळकटी देण्याचे काम या फेलोशिपमधून होत आहे. तंत्रज्ञान आधारित उत्पादने बनवू पाहणाऱ्या कृषी व्यावसायिक, नवउद्योजक तरुण-तरुणींना फेलोशिप मोलाची ठरते. त्यासाठी http://www.sharadpawarfellowship.com या संकेतस्थळावर १८ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करता येईल. पात्र फेलोंची घोषणा २६ नोव्हेंबरला होईल व त्यानंतर मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आठ डिसेंबरला फेलोशिप प्रदान केली जाईल.

कृषी फेलोशिपसाठी १२ डिसेंबर २०२४ ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान अटल इनक्युबेशन सेंटर (बारामती) येथे; तर चार एप्रिल २०२५ ते दहा एप्रिल २०२५ दरम्यान सह्याद्री फार्म (नाशिक) येथे मार्गदर्शन मिळेल. एक ऑगस्ट २०२५ पासून ४५ दिवस संबंधित संस्थांमध्ये इंटर्नशिप मिळेल. या उपक्रमाच्या माहितीसाठी https://www.sharadpawarfellowship.com/या संकेतस्थळाचा वापर करता येईल. पत्रव्यवहार agri@sharadpawarfellowship.com या मेलवर किंवा माहितीसाठी. संतोष मेकाले : ९८६०७४०५६९ व अतुल तांडेल ः७२०८३९४१४४ यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com