Groundnut  Agrowon
ॲग्रो विशेष

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

Kharif Season 2025 : खानदेशात भुईमुगाची पेरणी किंवा लागवड सुरूच आहे. या आठवड्यात लागवडीस गती आल्याची स्थिती होती. यंदा क्षेत्रात काहीशी वाढ होईल, असे चित्र आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात भुईमुगाची पेरणी किंवा लागवड सुरूच आहे. या आठवड्यात लागवडीस गती आल्याची स्थिती होती. यंदा क्षेत्रात काहीशी वाढ होईल, असे चित्र आहे. लागवड ऑगस्टपर्यंत सुरू राहील, असे दिसत आहे.

आगाप भुईमुगाची पेरणी जूनच्या सुरुवातीला अनेकांनी केली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात भुईमूग पेरणीला वेग आला. अनेकांची पेरणी यंदा पावसाने वेळेत झाली आहे. सर्वाधिक पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात झाली आहे.

खानदेशात भुईमुगाची आगाप लागवड किंवा पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केली जाते. शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती दिली आहे. मध्यंतरी सतत पाऊस होता. यामुळे लागवड रखडली. ही लागवड सरत्या आठवड्यात अनेक भागात झाली आहे.

मागील हंगामात खानदेशात सुमारे ७०० हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली होती. यंदा ही पेरणी सुमारे ७५० हेक्टरवर झाल्याची माहिती आहे. यंदा पाऊसमान काही भागात बरे आहे. तर काही भागात पाऊसमान कमी आहे. धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा, नवापूर, जळगावातील चोपडा, चाळीसगाव आदी भागात पेरणीनंतर लागलीच पाऊस आल्याने उगवण बरी झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील पश्चिम भागातही भुईमूग आहे. धुळे व जळगाव जिल्ह्यात सर्वत्र जूनमध्ये सरासरीच्या १०० टक्के झाला आहे. नंदुरबारात फक्त सुमारे १२ टक्के पावसाची तूट जूनमधील पावसासंबंधी आहे.

जोरदार पाऊस हवा

जळगावात एकूण सरासरीच्या 50 टक्के पाऊस अजून झालेला नाही. हलका ते मध्यम पाऊस झाला. त्याचा भुईमूग पिकास त्याचा उपयोग होत आहे. पण जोरदार पाऊस हवा आहे. भुईमुगाची पेरणी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर, चोपडा, यावल, भडगाव, एरंडोल, धुळ्यातील साक्री, धुळे, नंदुरबारातील शहादा, नवापूर, नंदुरबार भागात झाली आहे. यातील शहादा भागात पाऊसमान कमी आहे. यात अनेकांनी तुषार व ठिबक सिंचनाच्या मदतीने भुईमूग पिकात सिंचन केले आहे. अनेकांनी काळ्या कसदार जमिनीत लागवड केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

AI In Agriculture : सांगली जिल्हा बँक ‘एआय’साठी देणार अनुदान

Agriculture Marketing : शेतीमाल मार्केटिंग साठी ‘कृषी-पणन’ने एकत्र यावे

Banana Farming : कांदेबाग केळी पिकासाठी शेणखताची शोधाशोध

Papaya Farming : खानदेशात पपई पीक फळकाढणीवर

Jal Samadhi Protest : आडोळ खुर्द ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन

SCROLL FOR NEXT