
Nanded News: नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत असलेल्या नवा मोंढा बाजारात सध्या भुईमूग शेंगाची आवक सुरू आहे. या शेगांना कमाल ५९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्राने दिली.
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारात सध्या सर्वच शेतीमालाची आवक सर्वसाधारण आहे. बुधवारी (ता. १८) नवा मोंढा बाजारात साडेपाचशे क्विंटल शेंगाची आवक झाली. यास कमाल ५९००, किमान ४९२५, तर सरासरी ५६७५ प्रतिक्विंटल दर मिळाला. पेरणीचे दिवस तसेच पावसामुळे आवकेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
सध्या बाजारात भुईमूग शेंगा येत आहेत. मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भुईमूग शेंगा काढता आल्या नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. काही शेतकऱ्यांनी पावसापूर्वी शेंगा काढून घेतल्यामुळे ते सध्या बाजारात विक्रीसाठी आणत आहेत.
हळद, सोयाबीन, हरभऱ्याची आवक
सध्या बाजारात हळदीची आवकही बऱ्यापैकी आहे. बुधवारी हळदीला कमाल १३४२५, किमान १०५००, तर सरासरी १२२०० रुपये दर मिळाला. सोयाबीनला मात्र हमीदरापेक्षा कमी दर मिळत आहे. सोयाबीनला कमाल ४२४०, किमान ३९९०, तर सरासरी ४२१० रुपये दर मिळाला.
हरभरा कमाल ५१६५, किमान ५१४५ तर सरासरी ५१६५ रुपये दर मिळाला. तूर दर कमाल ६२००, किमान ६२००, तर सरासरी ६२०० दर मिळाला. ज्वारी कमाल २७८०, किमान १४७० तर सरासरी २३५० रुपये दर मिळाला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.