Farmer Issue
Farmer IssueAgrowon

Groundnut Crop Damage : भुईमूग नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Crop Loss Compensation : बारव्हा (ता. मानोरा, वाशीम) येथील गौरव पवार या शेतकऱ्याने आपला भुईमूग मानोरा बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. या वेळी अचानक आलेल्या पावसात सुमारे दीड ते दोन क्‍विंटल भुईमूग शेंगा वाहून गेल्या.
Published on

Nagpur News : अचानक आलेल्या पावसामुळे भुईमूग शेंगा वाहून गेल्याने इंदल पवार या शेतकऱ्याचे नुकसान झाले होते. या घटनेला रविवारी (ता. १५) महिनाभराचा कालावधी पूर्ण होऊनही या शेतकऱ्याला शासकीय मदत मिळालेली नाही. विशेष म्हणजे खुद्द कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या शेतकऱ्याला जिल्हा प्रशासनामार्फत मदतीचे आश्‍वासन दिले होते.

बारव्हा (ता. मानोरा, वाशीम) येथील गौरव पवार या शेतकऱ्याने आपला भुईमूग मानोरा बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. या वेळी अचानक आलेल्या पावसात सुमारे दीड ते दोन क्‍विंटल भुईमूग शेंगा वाहून गेल्या. परिणामी मोठे नुकसान झाले.

Farmer Issue
Farmer Assistance: भुईमूग वाहून गेलेल्या शेतकऱ्याला प्रशासनाच्या मदतीची प्रतीक्षाच!

मानोरा बाजार समितीने या घटनेची दखल घेत शेतकऱ्याप्रती संवेदना जपत तत्काळ २० हजार रुपयांची मदत केली. त्यानंतर ‘ॲग्रोवन’ने देखील मदतीचे आवाहन केल्याने त्या माध्यमातून २० हजार रुपयांचा निधी शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला.

Farmer Issue
Rain Crop Damage : भोर तालुक्यात १३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अशाप्रकारे ४० हजारांची मदत या शेतकऱ्याला मिळाली. दरम्यान या घटनेची दखल घेत केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी इंदल पवार यांच्याशी थेट फोनवरून संवाद साधला. तसेच धीर देत मदतीचे आश्‍वासन दिले होते.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी फोनवरून चौकशी करून धीर दिला. मदतीचे आश्‍वासनही दिले होते. परंतु मानोरा बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे व ‘ॲग्रोवन’ने केलेल्या मदतीच्या आवाहनानंतर मिळालेले अतिरिक्‍त वीस हजार रुपये या शिवाय कोणतीही मदत मिळाली नाही.
- गौरव पवार, शेतकरी, बारव्हा, ता. मानोरा, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com