Anandacha Shidha agrowon
ॲग्रो विशेष

Anandacha Shidha : ‘आनंदाचा शिधा’ गुढीपाडव्याला मिळणार

राज्यातील एक कोटी ६३ लाख शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे. गेल्या दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ देण्यात आला होता.

Team Agrowon

Jalgaon News : गरिबांना मराठी नवीन वर्षाला महागाईची (Inflation) झळ नको, म्हणून राज्य शासनाने १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ (Anandach Shidha) (रवा, डाळ, साखर, तेल) देण्याचे जाहीर केले आहे. सोबत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तही (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) ‘आनंदाचा शिधा’ मिळेल.

त्यासाठी मात्र कार्डधारकांना रेशनकार्ड आधारकार्डाशी लिंक करून घ्यावे लागणार आहे. जिल्ह्यात सहा लाखांवर कार्डधारक लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली.

राज्य मंत्रिमंडळाने याबाबत निर्णय घेतला आहे. राज्यातील एक कोटी ६३ लाख शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे. गेल्या दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ देण्यात आला होता.

हा ‘आनंदाचा शिधा’ देण्यासाठी आवश्यक जिन्नसांची खरेदीसाठी ‘महाटेंडर्स’ या ऑनलाइन २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. काहींना दिवाळीत, तर काहींना दिवाळीनंतर ‘आनंदाचा शिधा’ मिळाला होता.

‘आनंदाचा शिधा’ पाकिटावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र नव्हते. यामुळे ती पाकिटे परत मागविली होती, काही ठिकाणी साखर, तेल न मिळताच शिधावाटप झाला होता. यामुळे ‘आनंदाचा शिधा’ चांगलाच गाजला होता.

आता परत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने रेशन कार्डधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब कर्डधारकांना लाभ मिळणार आहे.

प्राधान्य गटात चार लाख ९० हजार ६४०, अंत्योदय एक लाख ३४ हजार ३५७ कार्डधारक, अशा एकूण सहा लाख २४ हजार ९९७ कार्डधारकांना शिधा मिळणार आहे.

शासनाच्या निर्णयानुसार येत्या गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात सहा लाखांवर कार्डधारकांना आनंदाचा शिधा प्रत्येकी १०० रुपयांत वाटप होणार आहे; मात्र, त्यासाठी लाभार्थ्यांनी आधारकार्ड लिंक करण्याची गरज आहे.
सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Politics: ‘लक्ष्मी दर्शना’चे विकृत प्रदर्शन

Indian Economy: वाट सकल मूल्यवर्धनवाढीची!

Agriculture FPO: कवठेत कृषी प्रक्रिया, उपक्रमांची ‘समृद्धी’

Onion Planting Machine: कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची यंत्राला पसंती

Safflower Cultivation: करडई पिकाची लागवड १५१ टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT