Ration Shops : रेशन दुकानांना ‘कार्पोरेट लूक’

रेशनधारकांना चांगली सुविधा मिळाव्यात यासाठी पुरवठा विभाग प्रयत्‍नशील असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातील १० दुकानांचा या योजनेत समावेश केला आहे.
Ration Shop
Ration ShopAgrowon

जि. रायगड ः जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानांना (Ration shops) आता कॉर्पोरेट लूक येणार असून आयएसओ मानांकन (ISO rating) देण्याची योजना जिल्हा पुरवठा विभागाकडून राबवण्यात येणार आहे. यामुळे दुकानातील अस्वच्छता, नेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, रेशनधारकांना दिली जाणारी वाईट वागणूक, धान्य मोजताना होणारी हातचलाखी कमी होईल, असा विश्वास पुरवठा विभागाला आहे. रेशनधारकांना चांगली सुविधा मिळाव्यात यासाठी पुरवठा विभाग प्रयत्‍नशील असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातील १० दुकानांचा या योजनेत समावेश केला आहे.

Ration Shop
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘टास्क फोर्स’

रेशन दुकानांमध्ये स्वच्छता, आकर्षक मांडणी, वेळेवर धान्य वितरण, कोणत्या योजनेंतर्गत किती धान्य प्राप्त झाले, याची माहिती फलकावर उपलब्ध करून देण्याच्या सूचना पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत. यापुढे रेशन दुकानचालक चक्क गणवेशात असतील आणि धान्य वाटप करताना अल्पउत्पन्न गटातील ग्राहकांशी सौजन्याने वागताना दिसतील. ग्राहकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या रेशन दुकानांना आयएसओ मानांकन प्राप्त होणार आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रेशन दुकानचालकांनी तयारीही सुरू केली आहे.

Ration Shop
Cotton Rate : पावसामुळं कापूस उशीरा येणार?

यासंदर्भातील आढावा जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. रेशन दुकानातील गैरकारभाराला आळा बसावा, लाभार्थ्यांना दर्जेदार धान्यासह चांगली वागणूक मिळावली, यासाठी जिल्‍हा पुरवठा विभागाकडून सुरुवातीला १० दुकानांत योजना राबविण्यात येणार अाहे. धान्य वितरण पारदर्शक होणार वजन-काटे प्रमाणित असल्याचे प्रमाणपत्र दुकानाबाहेर लावले जाईल, त्याबाबत शंका असल्यास कोठे तक्रार करायची, याबाबतचे क्रमांक, पत्त्याचाही बोर्ड दुकानाबाहेर लावला जाईल. दुकानदार, तसेच दुकानाबाबत काही तक्रारी असल्यास त्याबाबतही कोठे तक्रार करावी, याची माहिती देणारे बोर्ड लावणे बंधनकारक राहणार आहे.

दुकानातील उपलब्ध धान्याची आवक-जावक, उपलब्ध साठा याचीही माहिती या बोर्डवर लिहिण्यात येणार आहे. यासाह रेशनधान्य दुकानात नेट कनेक्टिव्हिटीची सोयदेखील केली जाणार आहे. काय बदल होणार? चालू महिन्यात किती धान्य उपलब्ध झाले, याची माहिती फलकावर असेल. सीसी टीव्ही, प्रथमोपचार पेटी, अग्‍निशमन यंत्र, पिण्याचे आरओ पाण्याची सुविधा निकृष्ट धान्य ग्राहकांना वाटप न करता गोदामातून बदलून देणार. दुकानदाराचा मोबाईल क्रमांक, परवान्याची प्रत दर्शनी भागावर असेल.चढ-उतार करताना धान्याची नासाडी रोखणार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com