Ration Card Scheme : ऊसतोड कामगारांनी रेशन कार्ड’ योजनेचा लाभ घ्यावा

ऊसतोड कामगारांनी ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.
Sugarcane Worker
Sugarcane WorkerAgrowon

परभणी ः जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार सात हजार ऊसतोड कामगार (Sugarcane Workers) आहेत. इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार आलेले आहेत. या कामगारांची अन्नधान्याची (Food Grain) सोय व्हावी यासाठी पुरवठा विभागामार्फत अन्नधान्य पोर्टबिलिटी योजना (Food grain Portability Scheme) सुरू करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांनी ‘एक देश एक रेशन कार्ड’ (One Nation One Ration Card) या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.

ऊसतोड कामगारांना एक देश एक रेशन कार्ड, आरोग्य तपासणी, शैक्षणिक समस्या, ओळखपत्र देणे व स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या विविध समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यासंदर्भात शुक्रवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, समाजकल्याण सहायक आयुक्त गीता गुट्टे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक यांची उपस्थित होते.

Sugarcane Worker
Sugarcane Crushing : ऊस गाळप ८० लाख टनांवर

बहुतांश ऊसतोड कामगार हे इतर जिल्ह्यातून स्थलांतरित होऊन आले आहेत. त्यामुळे योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित कारखान्याचे सरव्यवस्थापक यांनी संबंधित तहसीलदार यांच्या संपर्कात राहून ऊसतोड कामगारांना अन्नधान्य पोर्टबिलिटी योजनेअंतर्गत स्वस्त अन्नधान्य उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.

प्रत्यक्ष ऊसतोडीचे काम करणाऱ्या कामगारांना फंडाच्या ठिकाणी व साखर कारखाना परिसरात सोमवार (ता. १६)पासून जिल्हा परिषदेच्या आरोग्यामार्फत ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी सुरू आहे, ती बुधवार (ता. २५)पर्यंत सुरू राहणार आहे.

Sugarcane Worker
Ration Shop : स्वस्त धान्यासाठी लाभार्थ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार

जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांची नोंद घेण्याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच सरव्यवस्थापकांनी ऊसतोड कामगारांची परिपूर्ण माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी व सहायक आयुक्तांकडे द्यावी. या कामगारांसंदर्भात शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी विशेष मोहीम व कॅम्प राबवावेत.

त्यांची मुले कुपोषित राहू नयेत यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी व बालविकास अधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे. त्यांच्या पाल्यांना हंगामी वसतिगृह, तसेच इतर शिक्षण विभागाच्या शाळांच्या माध्यमातून शिक्षण घेण्यास प्रवृत्त करावे.

ऊसतोड कामगारांसंदर्भात सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने काम करावे, अशा सूचना गोयल यांनी केल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com