Village Economy: सातारा जिल्ह्यातील कवठे (ता. वाई) गावात नवी कृषी समृद्धी आकाराला आली आहे. येथे समृद्धी शेतकरी उत्पादक सहकारी संस्था मर्यादित या नावाने उभी राहिलेली ही संस्थ शेतकरी व महिलांमध्ये उद्योजकता घडवत आहे. सेंद्रिय खत, प्रक्रिया उत्पादने. हमीभाव केंद्र आदींच्या उपक्रमांमधून वार्षिक कोटीच्या उलाढालीपर्यंत व साडेचार हजार शेतकऱ्यांचे नेटवर्क तयार करण्यापर्यंत कंपनीने यशस्वी पल्ला गाठला आहे. .सा तारा जिल्ह्यातील वाई तालुका ऊस, हळद आणि भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र गुणवतेच्या तुलनेत मिळणारे कमी भाव, हवामानाचे धोके तसेच अन्य समस्यांमुळे शेती अशाश्वत झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी तालुक्यातील कवठे येथील काही जिद्दी व अनुभवी तरुण एकत्र आले. त्यातून २०२१ मध्ये समृद्धी शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेची स्थापना झाली. शेतकऱ्यांचे उत्पादन, त्यांनीच प्रक्रिया करायची व त्यांनीच विक्री व्यवस्था उभारायची हे मुख्य उद्देश ठेवले. केवळ नफा कमविणे हे ध्येय न ठेवता सहकार, विज्ञान आणि पारदर्शकता या त्रिसूत्रीवर पाया रचला..संस्थेचे खंदे नेतृत्व‘समृद्धी’चे अध्यक्ष विकास भगतसिंग डेरे यांनी संस्थेकडे व्यापार म्हणून न पाहता सेवा म्हणून पाहिल्याने शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत झाली. केवळ चूल आणि मूल यात अडकून न राहता महिला अर्थकारणाचा मुख्य भाग झाल्या पाहिजेत यादृष्टीने उपाध्यक्ष रत्नमाला भूषण डेरे यांनी महिला सक्षमीकरणाची धुरा सांभाळली. त्यांनी महिला बचत गटांना शेतकरी कंपनीच्या मुख्य प्रवाहाशी जोडले. काटेकोर हिशेब, कागदपत्रांची पूर्तता, शासकीय योजनांचा पाठपुरावा आदींमध्ये संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण सुरेश डेरे यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. तज्ज्ञ संचालक शैलेश पाटणे आणि सुभाष पाटणे यांनी उत्पादन गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले. निर्यातीच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या. ‘नाफारी’ संस्थेकडून गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण मिळाले..Farmer Success Story: वीस वर्षांपासून शेतीत ‘बिनहाती’ झुंज....संस्थेचे प्रकल्प हमीभाव केंद्रशेतकऱ्यांचे सर्वांत मोठे शोषण विक्री व्यवस्थेत होते. त्यादृष्टीने ‘समृद्धी’ने नाफेड अंतर्गत सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. हे केंद्र मिळविणारी ही राज्यभरातील बहुधा पहिली शेतकरी उत्पादक गटामधील सहकारी संस्था ठरली. यामुळे शेतकऱ्यांना आपला माल थेट शासनाला विकता येत आहे. त्यातून वजनकाट्यातील फसवणूक थांबली आणि हक्काचे पैसे थेट बँक खात्यात जमा होऊ लागले..सेंद्रिय खत निर्मितीरासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनी नापीक होत चालल्या होत्या. यावर उपाय म्हणून प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ व निवृत्त कृषी शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेसमड आधारित सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला. डॉ. साबळे यांनी या खतनिर्मितीचे पेटंट घेतले आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासह पिकांची प्रतिकारशक्तीही वाढवणाऱ्या या खताला शेतकऱ्यांसह आघाडीच्या उद्योगसमूहाकडून आणि नर्सरीजमधून मागणी आहे..प्रयोगशाळाकृषी विभागाच्या सहकार्याने संस्थेने गावात दीड लाखांच्या निधीतून उपकरणे घेऊन ग्रामस्तरीय मृदा परीक्षण प्रयोगशाळा सुरू झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना आता माती परीक्षणासाठी शहरात जावे लागत नाही. साहजिकच परीक्षण करून घेण्याकडे त्यांचा कल वाढणार आहे..प्रक्रिया उत्पादनांचा समृद्धी गोल्ड ब्रॅंडसंस्थेने केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेतला आहे. त्या अंतर्गत दीड कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. त्याद्वारे समृद्धी गोल्ड ब्रँड विकसित करण्यात आला आहे. यामध्ये हळद, आले यांचे लोणचे, गूळ व हळद पावडर, चिंच, आवळा कॅण्डी यासह सुमारे २५ प्रकारची उत्पादने व अन्य पौष्टिक स्नॅक्सचा समावेश आहे. उत्पादनांचे पॅकेजिंग व अन्य तंत्रासाठी मुंबई येथील आयआयटी तर ब्रँडिंग- मार्केटिंगसाठी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी तसेच मृणालिनी व माधव या भालेराव कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यांच्या माध्यमातून मिळालेल्या २० लाखांच्या आधारे ‘समृद्धी गोल्ड’ ब्रॅंड मॉल आणि ऑनलाइन मार्केटमध्ये जाणे शक्य झाले आहे..Agriculture Success Story: गवारीच्या खेळत्या पैशाने दिला मोठा आधार.संस्थेची उल्लेखनीय वाटचालमोजक्या सभासदांपासून सुरू झालेला प्रवास आज साडेसातशे शेतकरी सदस्यांपर्यंत पोहोचला आहे.साडेचार हजारांहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत तयार झाले नेटवर्क- यात अल्पभूधारक शेतकरी, महिला आणि ग्रामीण युवकांचा मोठा सहभाग.संस्थेची आर्थिक उलाढाल दरवर्षी चढत्या क्रमाने वाढत आहे. सन २०२२-२३ मध्ये ९२ लाख, २०२३-२४ मध्ये १.०८ कोटी, तर २०२४-२५ मध्ये १.०९ कोटी उलाढाल..संस्था शंभर टक्के कर्जमुक्त. आर्थिक शिस्त ही संस्थेची मोठी ताकद.जीएसटी, ‘एफएसएसएआय’ (अन्न सुरक्षितता) परवाने आणि स्वतःचा ट्रेडमार्क.संस्थेच्या ११ संचालकांपैकी सहा संचालक महिला.संस्थेच्या माध्यमातून १०० महिलांना उद्योजकता प्रशिक्षण..दिल्ली दरबारी दखलग्रामीण भागातील या संस्थेच्या यशाचा सुगंध दिल्लीपर्यंत दरवळला आहे. पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयापर्यंत समृद्धी गोल्ड ब्रॅंडची उत्पादने भेटवस्तूच्या रूपात पोचली आहेत. संस्थेचे सीईओ भूषण डेरे यांना दिल्ली येथे केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. समृद्धीच्या उत्पादनांचे औपचारिक उद्घाटन खुद्द शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते झाले. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी संस्थेच्या दहा शेतकरी जोडप्यांना ‘विशेष अतिथी’ म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. .संस्थेला २०२५ मध्ये राष्ट्रीय सहकारी उत्कृष्ट व गुणवत्ता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ‘सकाळ ॲग्रोवन’चे मुख्य संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांचे महा एफपीसी परिषदेद्वारे मार्गदर्शन संस्थेला मिळत आहे. सहकार तसेच कृषी विभाग, नाबार्ड यांचे मोलाचे पाठबळ मिळाले आहे. संस्था सदस्य किशोर शिंदे (वाई) यांचे उत्पादन गुणवत्ता, निर्मिती व प्रशिक्षणासाठी विशेष सहकार्य लाभले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.