Pune News : तेलबिया पिकांमध्ये महत्त्वाची ओळख असलेल्या करडई पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल यंदाच्या रब्बी हंगामात दिसून येत आहे. पुणे विभागात करडईची सरासरी पेरणी १५२२ हेक्टर अपेक्षित असताना प्रत्यक्षात २२९८ हेक्टरवर पेरणी झाली असून, १५१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यावरून करडई पिकाचे महत्त्व शेतकऱ्यांमध्ये वाढत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे..चालू हंगामात सातत्याने झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी वेळेत वाफसा झाला नाही. त्यामुळे करडईची पेरणी वेळेवर होऊ शकली नाही. मात्र परिस्थिती अनुकूल होताच शेतकऱ्यांनी उशिराने का होईना पेरणी सुरू केली. परिणामी, एकूण क्षेत्रात घट न होता उलट वाढच झाली आहे..Safflower Variety: ‘करडईचे दोन अधिसूचित वाण घोषित.पीक वाढीच्या अवस्थेत; थंडी पोषकसध्या बहुतांश भागात करडई पीक वाढीच्या अवस्थेत असून, वाढ समाधानकारक असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. यंदा थंडीचे प्रमाण चांगले असल्याने पीक जोमदार येण्यास मदत होत आहे. करडई हे चार महिन्यांचे पीक असून अनेक शेतकरी नोव्हेंबरपर्यंत पेरणी करतात. सध्या पेरण्या पूर्ण झाल्या असून पुढील काळ उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे..किडींचा संभाव्य धोकामागील काही दिवसांपासून अधूनमधून बदलणाऱ्या ढगाळ हवामानामुळे काही भागात मावा व तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यावर वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे..Safflower Sowing: करडईच्या पेरणी क्षेत्रात घट .पुणे-सोलापूर आघाडीवरगेल्या दोन ते तीन वर्षांपासून पुणे जिल्ह्यात तेलबिया पिकांविषयी जनजागृती वाढली आहे. त्याचा फायदा करडई पिकाला होताना दिसतो. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात वाफसा न झाल्यामुळे पेरणीवर परिणाम झाला आहे. सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पेरणीचा खोळंबा झाला आहे. जिल्ह्यात सरासरी १९७ हेक्टर क्षेत्र असताना यंदा केवळ २८ हेक्टरवर पेरणी झाली असून, ती केवळ १४ टक्के आहे. पाथर्डी, कर्जत, अहिल्यानगर व शेवगाव तालुक्यांत मर्यादित प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यात करडईचे सरासरी क्षेत्र ११९ हेक्टर असताना यंदा एकट्या बारामती तालुक्यात २३२ हेक्टरवर पेरणी झाली आहे..करडई पिकाची झालेली पेरणी (हेक्टरमध्ये)जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्केवारीनगर १९७ २८ १४पुणे ११९ २६५ २२३सोलापूर १२०६ २००५ १६६एकूण १५२२ २२९८ १५१.मंगळवेढ्यात सर्वाधिक पेरणीसोलापूर जिल्ह्यातही तेलबिया पिकांना महत्त्व वाढत आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा, अक्कलकोट, सांगोला व मंगळवेढा तालुक्यांतील शेतकरी करडईकडे वळले आहेत. यंदा मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक १,५०३ हेक्टरवर पेरणी झाली असून, अक्कलकोट तालुका त्यापाठोपाठ आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.