Agriculture Protection Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Protection : पीक संरक्षणावर अधिक भर

Team Agrowon

Farmer Management :

शेतकरी नियोजन

पीक : कपाशी

शेतकरी : विनोद भोयर

गाव : सुदी, ता. मालेगाव, जि. वाशीम

एकूण क्षेत्र : ५७ एकर

कपाशी : १० एकर

वाशीम जिल्ह्यातील विनोद भोयर यांनी जून महिन्यात कपाशीची १० एकरांत लागवड केली आहे. सध्या पीक पाते आणि बोंड लागण्याच्या अवस्थेत आहे. मागील काही दिवस सातत्याने पाऊस होत असल्याने त्याचा परिणाम पिकावर झालेला दिसत आहे. या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पीक व्यवस्थापनात वारंवार बदल करावे लागत आहेत. पीक वाढ, कीड-रोग नियंत्रणासाठी पिकावर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचे विनोद भोयर सांगतात.

लागवड नियोजन

उन्हाळ्यात जमिनीची नांगरट करून चांगल्याप्रकारे तापू दिली. त्यामुळे जमिनीतील किडींच्या अवस्था नष्ट होण्यास मदत झाली.

त्यानंतर ट्रॅक्टरच्या साह्याने वखरणीच्या दोन पाळ्या दिल्या. आणि एकरी दोन ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घेतले.

पुन्हा जमिनीचे चांगल्या प्रकारे सपाटीकरण करून घेतले. त्यानंतर बैलाच्या साह्याने शेतामध्ये चार फूट अंतरात काकर पाडून घेतले.

साधारण २० जूनला टोकण यंत्राच्या साह्याने चार बाय १ फूट अंतरावर लागवड केली. यामध्ये आंतरपीक म्हणून सहा तासांनंतर एक तास तुरीचे लावलेले आहे.

कपाशीची लागवड करतानाच रासायनिक खतांचा बेसल डोस दिला.

पीक ३० दिवसांचे झाल्यानंतर रासायनिक खतांचा दुसरा डोस दिला. त्यामध्ये एनपीकेसोबत सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये दिली. सोबत एमओपीसुद्धा दिले.

बैलाच्या साह्याने एक कोळपणी आणि एक निंदणीही करून घेतली.

हवामान बदलत असल्याने त्याचा पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मागील १० दिवसांमध्ये रासायनिक कीटकनाशके आणि बुरशीनाशकांची फवारणी घेतली आहे. सोबत ००ः५२ः३४ चा वापर केला आहे.

खत नियोजन करताना एनपीकेसोबत सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य दिले. त्यामध्ये मॅग्नेशिअम सल्फेटचे प्रमाण थोडे अधिक वापरले. कारण यापुढील काळात कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. लाल्या हा रोग नसून ही एक विकृती आहे जी अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होते. विशेषतः मॅग्नेशिअम सल्फेटची कमतरता असते. त्यासाठी आतापासूनच काळजी घेतली जात आहे.

कपाशीला नुकतीच दुसऱ्यांदा भर दिली आहे. ही भर दिल्यामुळे शेतातील अतिरिक्त पाणी बाहेर जाण्यास मदत होत आहे.

आगामी नियोजन

पुढील २० दिवसांत गरजेनुसार पुन्हा वखरपाळी दिली जाईल. यातून कपाशीला भर मिळेल.

दर पंधरा दिवसांनी आलटून-पालटून सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी घेतली जाईल. बोंड अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी आतापासूनच उपाय केले जातील.

पीक वाढीच्या अवस्थेतील कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे वेळोवेळी निरीक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार रासायनिक फवारणीचे नियोजन केले जाईल. तसेच पातेगळ होऊ नये यासाठी नियोजन केले जाईल.

विनोद भोयर ९८२३८२३५३१

(शब्दांकन : गोपाल हागे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत हरभरा दर ?

Marathwada Water Storage : मांजरा, निम्न तेरणा धरणाची नव्वदी पार

Animal Husbandary Department : सांगली जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांत ४३ पदे रिक्त

Soybean Procurement : मध्यप्रदेशमध्ये सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू; महाराष्ट्रात सरकारच्या हालचाली संथ!

Orange Crop Damage : संत्रा उत्पादकांना नुकसान भरपाई द्या

SCROLL FOR NEXT