Fungal Disease : बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतिरिक्त पाण्याचा निचरा करा

Water Drain : सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या, शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा तसेच खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Jalna News : अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर या पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ताबडतोब या पिकांमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा करा, असा सल्ला बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्र शास्त्रज्ञ डॉ. डी. एस. मुटकुळे यांनी दिला.

कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना येथे गुरुवारी (ता. ५) कृषी विज्ञान मंडळाचे अविरत चालणारे ३२५ वे मासिक चर्चासत्र झाले. या प्रसंगी डॉ. मुटकुळे बोलत होते. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगाव येथील अभियंता हर्षल खोडसकर, नितीन गायकवाड तसेच कृषी विज्ञान केंद्र, खरपुडीचे मृद्‍ शास्त्रज्ञ राहुल चौधरी, गृह विज्ञान तज्ज्ञ डॉ. संगीता कऱ्हाळे, अन्नतंत्र शशिकांत पाटील, पशुवैद्यक तज्ज्ञ डॉ. हनुमंत आगे, उद्यानविद्या तज्ज्ञ सुनील कळम, कृषी अभियंता पंडित वासरे, प्रक्षेत्र व्यवस्थापक विशाल तौर, निक्रा प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहायक एस. ए. पठाण यांची उपस्थिती होती.

Crop Damage
Crop Damage : स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत ९ लाख २६ हजारांवर पूर्वसूचना

डॉ. मुटकुळे म्हणाले, की जमिनीत पाणी साचल्यामुळे पिकांना मुळाद्वारे अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावली आहे. या वातावरणामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या, शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा तसेच खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी. कापूस पिकामध्ये अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी शेतात प्रत्येक एक ओळ सोडून लहान चर काढावेत.

Crop Damage
Crop Damage : मुसळधारेने रात्रीतून होत्याचे नव्हते केले

शक्य असेल तिथे वाफसा येताच कोळपणी व खुरपणी करावी. तुरीच्या शेतातील साचून राहिलेले पाणी ताबडतोब शेताबाहेर काढा. कुठलीही फवारणी करताना फवारणी नंतर किमान ५ ते ६ तास पाऊस पडणार नाही असा अंदाज घेऊनच फवारणी करावी. एका कीटकनाशकासोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, विद्राव्य खते, सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये. एकच कीटकनाशक त्याच पिकावर पुन्हा पुन्हा वापरू नये.

फवारणी करिता दूषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि रासायनिक किंवा बुरशी नाशकाचे प्रमाण शिफारसीतच वापरावे, कमी प्रमाण वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत. श्री. खोडसकर म्हणाले, की कृषी क्षेत्रात वापरण्यात येणारे सौरऊर्जाचलित पंप बसवितांना योग्य प्रकारच्या प्लेटची निवड करणे आवश्यक आहे.

प्लेटवर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सावली पडणार नाही याची काळजी घ्यावी. तसे केल्यास सदरील पॅनेलची कार्यक्षमता कमी होऊन वीज निर्मिती कमी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृद्शास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी तर आभार अभियंता पंडित वासरे यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com