Orange Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Arrival : राजस्थानपेक्षा नागपुरी संत्र्याला मोठी मागणी

Orange Production : गेल्या काही दिवसांपासून वाशीतील एपीएमसी बाजरात संत्र्यांची आवक वाढली आहे. यात नागपूर आणि राजस्थानमधून येणाऱ्या संत्र्यांची आवक मोठ्या प्रमाणात आहे.

Team Agrowon

Washi News : गेल्या काही दिवसांपासून वाशीतील एपीएमसी बाजरात संत्र्यांची आवक वाढली आहे. यात नागपूर आणि राजस्थानमधून येणाऱ्या संत्र्यांची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे एकीकडे किमतीवर त्याचा परिणाम झाला आहे, पण दुसरीकडे चवीमुळे नागपूरच्या संत्र्यांना राजस्थानपेक्षा ग्राहकांची पसंती अधिक मिळत आहे.

वाशी बाजारात दिवसाला १५० टन संत्र्यांची आवक होत आहे. यामध्ये प्रामुख्याने नागपूर, नगर आणि राजस्थानच्या संत्र्यांची आवक होत आहे. यापैकी ५५-६० टक्के संत्री नागपूरहून येत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. हंगामात संत्र्यांची आवक वाढल्याने संत्र्यांच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे.

प्रतिक्विंटल किमान दोन हजार ते कमाल तीन हजार पाचशे रुपयांचा भाव मिळत असून सरासरी दर २,७५० रुपये इतका आहे; तर एपीएमसी घाऊक बाजारात संत्री २०-५० रुपये किलो दराने विकली जात आहेत. किरकोळ बाजारात संत्र्यांचा दर विभाग आणि प्रतवारीनुसार ४५-९० रुपये प्रतिकिलो आहे. येत्या महिन्यात संत्र्यांची आवक वाढणार असल्याने बाजार भाव स्थिर राहतील, अशी माहिती एपीएमसी संचालक संजय पानसरे यांनी दिली.

रमझान काळात आवक वाढणार

आंबट-गोड चव, सुगंध नागपुरी संत्र्यांची वैशिष्ट्ये मानली जातात. याच आधारावर नागपुरी संत्र्यांना जीआय मानांकन आहे. इतर संत्र्यांपेक्षा नागपूरची संत्री चवीला गोड असल्यामुळे बाजारपेठेत सहज उपलब्ध असल्याने नागपूरची शान मानली जाते. शिवाय पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या रमझान काळात मागणी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

हिवाळ्यात संत्री खाण्याचे फायदे

हिवाळ्यात दररोज एक संत्री खाल्ल्याने शरीराला ‘क’ जीवनसत्त्वासारखे आवश्यक पोषक घटक मिळतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी-तापापासून संरक्षण होते. कोरड्या हिवाळ्यात संत्र्यांपासून हायड्रेशनमुळे त्वचेलाही फायदा मिळतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT