Orange Productivity : दर्जेदार रोपे, तंत्रज्ञानाद्वारेच वाढेल संत्र्यांची उत्पादकता

‘‘संत्र्याची उत्पादकता वाढविण्यासाठी दर्जेदार रोपांसोबतच आधुनिक तंत्रज्ञान वापरही महत्त्वाचा ठरतो. त्यानुसार संत्रा बागायतदारांनी व्यवस्थापनावर भर द्यावा,’’ असे आवाहन इस्राईल येथील लिंबूवर्गीय फळपिकांचे तज्ज्ञ डॉ. याईर इशेल यांनी केले.
Orange
Orange Agrowon

नागपूर ः ‘‘संत्र्याची उत्पादकता (Orange Productivity) वाढविण्यासाठी दर्जेदार रोपांसोबतच आधुनिक तंत्रज्ञान (Modern Technology) वापरही महत्त्वाचा ठरतो. त्यानुसार संत्रा बागायतदारांनी व्यवस्थापनावर भर द्यावा,’’ असे आवाहन इस्राईल येथील लिंबूवर्गीय (Citrus Crop) फळपिकांचे तज्ज्ञ डॉ. याईर इशेल यांनी केले.

Orange
Orange Export : संत्रा निर्यातीसाठी ३० टक्के अनुदान द्यावे

याईर इशेल यांनी कोहळी येथील डॉ. आरती पदमवार (वानखेडे) तसेच मेटपांजरा येथील प्रशांत कुकडे यांच्या संत्रा बागांची पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता (प्रभारी) डॉ. आर. एन. काटकर, डॉ. विनोद राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण कुसळकर, संत्रा गुणवत्ता केंद्राचे डॉ. रतिराम खोब्रागडे, प्रशांत कुकडे, कुणाल पदमवर, सुषमा वानखेडे ‘महाऑरेंज’चे संचालक मनोज जवंजाळ यांच्यासह काटोल तालुक्‍यातील संत्रा बागायतदार उपस्थित होते.

Orange
Orange Orchard : संत्रा बाग, नर्सरी, क्रेटनिर्मिती...

डॉ. इशेल म्हणाले, इस्राईलमध्ये संत्र्याचे एकरी ७० टनापर्यंत उत्पादन घेतले जाते. मात्र नागपुरी संत्र्यांची एकरी उत्पादकता अवघी सात ते आठ टन इतकी अत्यल्प आहे. शास्त्रोक्‍त व्यवस्थापनाचा अभाव, छाटणीकडे होणारे दुर्लक्ष, झाडातील मध्य फांद्यांना न पोचणारा सूर्यप्रकाश, दर्जेदार रोपांची उपलब्धता न होणे, अशी अनेक कारणे त्यामागे आहेत.

विंडो पद्धतीने छाटणी केल्यास झाडांना योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो. शिवाय झाडांमधून हवा खेळती राहते. त्यामुळे झाडांसोबत फळांची वाढ उत्तम होते. परिणामी शास्त्रशुद्ध पद्धतीने छाटणी करणे आवश्‍यक आहे.’’ या वेळी त्यांनी छाटणीचे प्रात्यक्षिकही करून दाखविले.

नागपुरी संत्र्याची उत्पादकता वाढ व दर्जा सुधारण्यासाठी कृषी विद्यापीठाअंतर्गत इंडो-इस्राईल संत्रा गुणवत्ता केंद्राची स्थापना नागपूर येथे केली आहे. या केंद्राला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू

- डॉ. विनोद राऊत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com