Orange Pruning Machine : देशी बनावटीच्या संत्रा छाटणी यंत्रासाठी मिळेना उत्पादक

Agriculture Technology : शास्त्रोक्‍त संत्रा छाटणीसाठी म्हणून केवळ ‘इटली मेड’ सयंत्राचा पर्याय असताना भोपाळ येथील संस्थेकडून खास देशी बनावटीचे सयंत्र विकसित करण्यात आले आहे.
Orange Pruning Machine
Orange Pruning MachineAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : शास्त्रोक्‍त संत्रा छाटणीसाठी म्हणून केवळ ‘इटली मेड’ सयंत्राचा पर्याय असताना भोपाळ येथील संस्थेकडून खास देशी बनावटीचे सयंत्र विकसित करण्यात आले आहे. मात्र या सयंत्राच्या उत्पादनासाठी उत्पादकच पुढे येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे हे सयंत्र मिळण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पहावी लागणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

संत्रा बागांमध्ये उत्पादकता आणि दर्जा टिकून राहावा, यासाठी शास्त्रोक्‍त छाटणीचे महत्त्व आहे. शेतकऱ्यांव्दारे पारंपरिक पद्धतीने मजुरांच्या माध्यमातून हे काम होते. त्यामुळे त्यातून अपेक्षित परिणाम साधता येत नाही.

त्यामुळेच छाटणीकामी सयंत्राची उपलब्धता असावी, अशी मागणी होत होती. परंतु देशी बनावटीचे असे सयंत्रच नव्हते. परिणामी इटली बनावटीचे सयंत्र आयात करावे लागत होते. या सयंत्राची किंमत ५० लाखांच्या घरात आहे. यातील साडेबारा लाख रुपये सीमा शुल्कापोटी चुकवावे लागतात.

Orange Pruning Machine
Mango Pruning : आंबा बागेची छाटणी कधी व केंव्हा करावी?

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अशा तीन सयंत्रांची खरेदी केली आहे. त्यातील एक काटोल (नागपूर) येथील प्रादेशिक संशोधन केंद्राच्या परिसरात ठेवण्यात आले आहे. मात्र या सयंत्राचे ब्लेड तुटल्याने ते गेल्या वर्षभरापासून वापराविनाच पडून आहे. येत्या काळात ते भंगारात निघण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

भारतात या सयंत्राचे ब्लेड वा अन्य कोणतेच पार्ट उपलब्ध होत नाहीत. त्याची थेट इटलीवरुनच आयात करावी लागते. परिणामी देशी बनावटीच्या सयंत्राचा पर्याय असावा, अशी मागणी होती. त्यानुसार भारतीय कृषी संशोधन परिषदे अंतर्गतच्या भोपाळ (मध्य प्रदेश) येथील अभियांत्रिकी संशोधन संस्थेने अशाप्रकारचे सयंत्र विकसित केले आहे.

Orange Pruning Machine
Grape Pruning Management : माती, पाणी परीक्षणानुसार द्राक्ष छाटणी व्यवस्थापन करा

देशी सयंत्र मिळणार दहा लाखांत

भारतीय बनावटीच्या संत्रा छाटणीची किंमत अवघी साडेचार लाख रुपये आहे. त्याचे उत्पादन व साहित्याचा दर्जा वाढविल्यास उत्पादकांच्या माध्यमातून त्याची उपलब्धता अवघ्या दहा लाख रुपयांत होईल. त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग देखील सहज उपलब्ध होतील, असा दावा करण्यात आला आहे. यासाठी वापरण्यात आलेले ब्लेडही अवघ्या दोन हजार रुपयांचे आहे, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

अमरावती जिल्ह्यात दोन सिट्रस इस्टेट प्रस्तावित आहेत. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन छाटणी यंत्र दिली जातील. परंतु इटली बनावटीचे सयंत्र ५० लाखांचे आहे. भोपाळ येथील अभियांत्रिकी संस्थेने देशी सयंत्र विकसित केले आहे. अवघ्या साडेचार लाख रुपयांचे हे सयंत्र दहा लाखांत मिळेल. परंतु अवजारे उत्पादकांशी सामंजस्य करार झाला नसल्याने या सयंत्राचे उत्पादन रखडले आहे. अमरावती येथील उत्पादकांशी याबाबत संपर्क साधला आहे.
- राहुल सातपुते, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, अमरावती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com