Farm Loan Waiver Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waiver: कर्जमाफीबाबत सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात

Political Betrayal of Farmers: विधानसभा निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देणारे सत्ताधारी आता आर्थिक परिस्थितीचे कारण देत आहेत. शेतकऱ्यांशी पुन्हा एकदा फसवणूक झाली आहे. आश्वासन पाळावे व संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी किसान सभेची मागणी आहे.

Team Agrowon

Pune News: विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते मिळविली. आज मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता कर्जमाफी करता येणार नाही, अशी विधाने केली जात आहेत.

सरकारने केलेला शेतकऱ्यांचा हा पुन्हा एकदा नवा विश्वासघात आहे, असा आरोप करीत सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळावे व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी,

अशी मागणी पत्रकाद्वारे किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी केली आहे. माणसाने अंथरूण पाहून पाय पसरावे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी इतके मोठे अंथरूण राज्य सरकारचे सध्या नाही, असे विधानही राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेले आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याएवढे मोठे अंथरूण राज्य सरकारचे नव्हते याची जाणीव निवडणुकीत शेतकऱ्यांना आश्वासन देऊन मते पदरात पाडून घेतेवेळी नव्हती का, असा प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहे.

मते मागत असताना आपले अंथरूण किती आहे, तितकीच आश्वासने द्यावीत, असे का वाटले नाही, हा प्रश्न शेतकरी समुदायातून विचारला जात आहे. या वर्षी व पुढील वर्षी तरी कर्जमाफीची शक्यता नाही, शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून कालांतराने कर्जमाफीचा निर्णय घेऊ, असेही अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिवाशी होत असलेला खेळ थांबवावा, असे आवाहन किसान सभा करत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Digital Agriculture School: डिजिटल शेतीशाळेतून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

Indigenous Livestock Recognition: ‘उमरडा’ गाईला स्वतंत्र देशी गोवंश, तर माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय मान्यता

AI in Agriculture: शेती क्षेत्रात ‘एआय-डिजिटल ट्विन’ प्रायोगिक तत्त्वावर राबवविणार

Farmer Aadhar Verification Process: आधार प्रमाणीकरणासाठी विशेष प्रक्रिया

Grape Growers Conference: द्राक्ष बागायतदार संघाचे अधिवेशन; २४ ते २६ ऑगस्टदरम्यान पुण्यात आयोजन

SCROLL FOR NEXT