
Maharashtra Politics : १०० दिवसात राज्य सरकार अनेक गोष्टी करून दाखवणार असा संकल्प दिला होता. परंतु, या सरकारने शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, लाडकी बहीण योजना, राज्यात होणारे रस्ते घोटाळे यावर काम केलं नाही. यांना शेतकरी प्रश्नाऐवजी औरंगजेबाच्या कबरीसारखे प्रश्न महत्वाचे वाटत आहेत. अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबई येथे गुरूवारी(ता.२७) पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर गंभीर टीका केली. यावेळी ठाकरे म्हणाले की, "राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले पण शेतकरी, लाडकी बहीण, सामान्यांना या अधिवेशनातून काय मिळालं, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विरोधकांकडून सरकारच्या अधिवेशनातील कामकाजावर टीका होत आहे, या अधिवेशनातून जनतेला काहीच मिळालं नाही. सरकारने मांडलेले निरर्थक अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं". अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
"ज्या ज्या गोष्टी निवडणूक जिंकण्यासाठी या सरकारने केल्या होत्या त्याच्याबद्दल कसलीही वाच्यता होताना पहायला मिळत नाही. अस्वस्थता लपवणारे हे अधिवेशन होते. कृषी विभागमध्ये आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्रबिंदू योजनांची अंमलबजावणी करणार असे सांगितले होते त्याचे काय झाले? शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्तचं सुरू आहेत. हमीभाव मिळतच नाही हमीभावापेक्षा कमी दराने सरकार शेतकऱ्याचा माल विकत घेत असल्याची स्थिती आहे. कापूस, सोयाबीन खरेदी केंद्रे या सरकारने बंद केली". अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
"सरकारकडून एकही संकल्प पूर्ण होताना पहायला मिळत नाही. रस्ते घोटाळ्यासह अनेक भ्रष्टाचारचे प्रकरण समोर आली आहेत. शेतकरी कर्जमाफीबद्दल सरकारने एक शब्दही काढला नाही. हमीभावाच्या मुद्दावर शेतकरी आंदोलन करत आहे परंतु सरकारला भलत्याच प्रश्नांमध्ये रस दिसत आहे. लाडक्या बहिणीला २१०० रुपये देण्याचे अमीष यांनी दाखवलं. आता वर्गवारी करून बहिणींना वगण्याचे काम सुरू आहे. नको ती योजना, अशी वेळ त्या बहिणीवर येते की काय? असे महिलांना वाटू लागले आहे". असा ठाकरेंनी सरकावर निशाणा साधला. कबरीपासून कामरापर्यतचे हे अधिवेशन होते, असेच उद्धव ठाकरेंनी म्हटले.
१०० दिवसांत काय केल?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या १०० दिवसांत काय घडलं असा सवाल उपस्थित केला. यावर ठाकरे म्हणाले की, "बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली. स्वारगेट बलात्कार प्रकरण घडलं. मुंबईत रस्ता घोटाळा झाला. शेतकरी कर्जमाफी करणार होते? कोरटकर सापडला पण शिक्षा काय होणार? सोलापूरकर फिरतोच आहे. जातीय दंगल नागपूरमध्ये झाली". यासह अन्य मुद्दावर बोट ठेवत उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.