Latur Crop Sowing Updates : विभागातील पाच जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्यामुळे मागील आठवड्यात शेतकऱ्यांनी पेरण्यांना वेग दिला आहे. यातूनच विभागात ८७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. विभागात खरिपाचे सरासरी २८ लाख ३० हजार ७०५ हेक्टर क्षेत्र असून गुरुवारपर्यंत (ता. ३०) विभागात २४ लाख ५१ हजार ४५९ हेक्टवरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान धाराशिव जिल्ह्यात सोायबीनवर शंखी गोगलगाय व पैसा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे..मागील आठवड्यात तुरळक हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे पिकांना काहीअंशी जीवदान मिळाले आहे. पेरणी झालेली पिके उगवणीच्या ते रोप अवस्थेत आहेत. विभागात सोयाबीन पिकाखालील सरासरी क्षेत्र १७ लाख ८६ हजार १२७ हेक्टर असून त्यापैकी १७ लाख ७२ हजार २८० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी पूर्ण झाली आहे. .सरासरी क्षेत्राच्या हे प्रमाण ९९ टक्के आहे. सोयाबीननंतर तुरीचे तीन लाख चार हजार ५९८ हेक्टर सरासरी क्षेत्र असून त्यापैकी दोन लाख ७३ हजार हेक्टरवर (६६ टक्के) तुरीची पेरणी पूर्ण झाली आहे..Crop Sowing Progress: सांगली जिल्ह्यात खरिपाचा पेरा पोहोचला ६५ टक्क्यांवर.तूर व सोयाबीन पिक सध्या उगवणीच्या ते रोप अवस्थेत आहे. कापसाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ४४ हजार ७८७ हेक्टर असून त्यापैकी तीन लाख ९८ हजार ३०३ क्षेत्रावर (९० टक्के) कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. कापूसही उगवणीच्या ते रोप अवस्थेत आहे. खरीप ज्वारी केवळ सात टक्के, मुगाची ३९ टक्के, उडिदाची ३६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे राहिलेल्या पेरण्याही लवकरच पूर्ण होतील, अशी आशा कृषी विभागाला आहे..Kharif Sowing 2026: जेमतेम पावसावरच खरीप पेरणी अंतिम टप्प्यात.दरम्यान धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकावर काही ठिकाणी शंखी गोगलगाय व पैसा (मिलीपेड) किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. नियंत्रणासाठी मेटाल्डीहाईड सारख्या रासायनिक गोळ्यांचा वापर आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये कापूस पिकावर अल्प प्रमाणात रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे..विभागातील जिल्हानिहाय पेरणीजिल्हा सरासरी क्षेत्र (हे.) प्रत्यक्ष पेरणी (हे.) टक्केवारीलातूर ५,८६,१०१ ४,७४,१४१ ८१धाराशिव ५,५५,१६१ ४,६७,७७३ ८४नांदेड ७,६१,५७६ ७,२६,८८६ ९५परभणी ५,१८,४६८ ४,५१,२२२ ८७हिंगोली ४,१०,३९९ ३,३१,४३७ ८१एकूण २८,३०,७०५ २४,५१,४५९ ८७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.