Sangli Water Stock Update: सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप असली तरी, वारणा आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढवला असल्याने कृष्णा आणि वारणा नदीची पाणी पातळी वाढू लागली आहे. खटाव-नांद्रे पूल तसेच नागठाणे-बंधारे पाण्याखाली गेला आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १५ मिलीमीटर इतक्या पावसाची पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी (ता. १) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने कृष्णा नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे..जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ३१) सर्वदूर पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळपासून बहुतांश भागात हलका पाऊस सुरु होता. वारणा धरणात २९.७२ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. वारणा धरण पाणलोट परिसरात संततधार पाऊस सुरु असून गेल्या चोवीस तासात ६५ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. वारणा धरणातून ६९०० क्युसेकने विसर्ग सरु आहे. वारणा पाणलोट परिसरात १५८१ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे..Pune Heavy Rain: पुणे जिल्ह्यातील सतरा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू.कोयना धरणातून ३३ हजार ८२६ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. सांगलीतील शुक्रवारी (ता. ३१) आयर्विन पुलाजवळ १४.१० फूट इतकी पातळी होती..Sangli Rain Update: सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप.शनिवारी (ता.१) आयर्विन पुलाजवळ कृष्णा पाणी पातळी २४ फूट ६ इंच इतकी झाली आहे. आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी बारा तासांत १० फुटांनी वाढली आहे. हिप्परगी बॅरेज येथे ८७९०० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. अलमट्टी धरणात ९२५०० क्युसेक इतक्या पाण्याची आवक होत आहे. धरणातून १ लाख १० हजार क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे..विसर्गाची स्थितीसांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध धरणांतून सांडवा, कालवा व विद्युतगृहाद्वारे सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे : धोम (८२१९), कण्हेर (६०७२), धोम बलकवडी (३२७४), उरमोडी (४९६२), तारळी (३५९६), राधानगरी (४२५६), कासारी (९५०).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.