Maharashtra Agricultural Commodities : खरीप हंगामातील पेरण्या सुरू असतानाच तुरीच्या बाजारभावाला चांगला आधार मिळत आहे. राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक सुरू असली, तरी मर्यादित उपलब्धता आणि प्रक्रिया उद्योगांकडून कायम असलेल्या मागणीमुळे दरात सुधारणा झाली आहे. .धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २८) तुरीला प्रति क्विंटल ८४१० रुपये असा कमाल दर मिळाला. हा दर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ८४५० रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) जवळ पोहोचला आहे..Tur Price Hike: तूर ९ हजारांचा टप्पा गाठणार.मागील हंगामातील बहुतांश तूर शेतकऱ्यांनी आधीच विक्री केल्यामुळे सध्या बाजारात विक्रीयोग्य तूर मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. दुसरीकडे, डाळ प्रक्रिया उद्योगांकडून मागणी कायम असल्याने बाजारभावाला आधार मिळत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे..धामणगाव बाजार समितीत मंगळवारी सुमारे १७३२ पोती तूर दाखल झाली. दर्जानुसार तुरीला ७५०० ते ८४१० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याने परिसरातील उत्पादक मोठ्या प्रमाणात येथे तूर विक्रीसाठी आणत असल्याचे दिसून येत आहे..Agriculture Market Update: कोथिंबीर, मेथीच्या दरात सुधारणा.दरम्यान, गुरुवारी (ता. ३०) अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत १०४६ क्विंटल तुरीची आवक झाली. येथे तुरीला ७५०० ते ८०५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तुरीच्या दर्जानुसार दरात फरक पडत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. यंदाच्या खरीप विपणन हंगामासाठी केंद्र सरकारने तुरीचा किमान आधारभूत दर ८४५० रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे..दरवर्षी जुलैमध्ये तुरीचे दर इतके वाढलेले दिसत नाहीत. यंदा मात्र तुरीला ७५०० ते ८४१० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, दर्जेदार मालाला अधिक भाव मिळत आहे.- मनीष केला, व्यापारी, धामणगाव रेल्वे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.