Soybean Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Rate : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजारांची मदत द्या

Soybean MSP : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटाने पूर्णपणे उदध्वस्त झाला आहे. सरकारने ४८९२ रुपये प्रति क्विंटल हमीभाव देऊन राज्यातील सोयाबीन खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते.

Team Agrowon

Akola News : राज्य सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजारांची मदत द्यावी, अशी मागणी वाशीम जिल्ह्यातील भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड बाजार समितीचे सभापती विष्णूपंत भुतेकर यांनी मुख्यंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत त्यांनी म्हटले की, राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटाने पूर्णपणे उदध्वस्त झाला आहे. सरकारने ४८९२ रुपये प्रति क्विंटल हमीभाव देऊन राज्यातील सोयाबीन खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ऑक्टोबरपासून आजपर्यंत केवळ एक ते दीड टक्के सोयाबीन हमी भावाने खरेदी केली. राज्यात ५० लाख मेट्रिक टन एवढे सोयाबीनचे उत्पादन झाले.

सरकारने आजपर्यंत केवळ पंधरा ते वीस हजार मेट्रिक टन खरेदी सोयाबीन केले. सरकारने दिलेला हमीभाव ४८९२ रुपये आहे. यातूनही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही हे माहिती असूनही शेतकरी सरकारच्या आश्वासनाला भुलले.

शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान करून सरकारने लाडकी बहीण, तसेच पीएम किसान या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत देण्याचा आव आणला.

मात्र त्या आडूनच सोयाबीन उत्पादक शेतकरी मात्र देशोधडीला लागला असून प्राथमिक गरजा सुद्धा शेतकऱ्यांच्या पूर्ण होताना दिसत नाहीत. नवीन मुख्यमंत्री आणि महायुतीचे सरकार आता स्थापन झालेले आहे.

सरकारने आर्थिक विपन्न अवस्थेत गेलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत नगदी स्वरूपात करावी, असेही भुतेकर यांनी मागणी करताना म्हटले आहे. सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा न केल्यास भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून आंदोलन हाती घेतले जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT