Soybean Market : सोयाबीन उत्पादकांना भाव फरक तातडीने द्यावा

Soybean Procurement : यंदा सोयाबीनच्या शासकीय खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. कुठल्याही केंद्रांवर खरेदी होताना दिसत नाही.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

Buldana News : यंदा सोयाबीनच्या शासकीय खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. कुठल्याही केंद्रांवर खरेदी होताना दिसत नाही. त्यामुळे शासनाने एकतर या खरेदीविषयी विश्‍वास निर्माण करावा किंवा शेतकऱ्यांना भावफरक तातडीने खात्यात द्यावा, अशी मागणी चिखली बाजार समितीचे माजी सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी म्हटले, की सोयाबीनला बाजारात ४२०० रुपये एवढा कमी भाव असताना आणि शासकीय हमीभाव ४८९२ रुपये असतानाही नाफेडच्या शासकीय खरेदी केंद्रावर अजूनही खरेदी सुरू झाल्याचे चित्र दिसत नाही.

Soybean Market
Soybean Market : देशात यंदा सोयाबीनचे गाळप कमी होणार; उत्पादन ६ टक्क्यांनी यंदा वाढले; उद्योगांचा अंदाज 

बुलडाणा जिल्ह्यात सर्वदूर अशीच परिस्थिती आहे. वास्तविक सध्या सोयाबीन हेच एक महत्त्वाचे पीक आहे. पीकपेऱ्यापैकी खरिपातील जवळपास ७० टक्के पेरा सोयाबीनचा असतो.

सरकारने हमीभावाची योजना जाहीर केली आणि सोयाबीन नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. तरी शेकडा १० टक्के लोकांनी सुद्धा अजूनपर्यंत नोंदणी केल्याचे दिसत नाही. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात पाच ते सहा हमीभाव खरेदी केंद्र आहेत. त्यापैकी केवळ एकमेव खरेदी केंद्र प्रत्यक्ष सुरू झाले आहे.

Soybean Market
Soybean Market : सोयाबीनाचा बाजारभाव अन् ओलावाही वाढेना

तिथेही आतापर्यंत नावापुरतीच खरेदी झाल्याचे दिसून येते. इतर खरेदी केंद्रावर तर उद्‌घाटनालाही सोयाबीन आल्याचे दिसत नाही. चिखली तालुक्यात जवळपास ६० हजारांवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली असेल आणि प्रत्यक्षात मात्र पाच हजार शेतकऱ्यांनीही नोंदणीसुद्धा केली नाही, यावरून प्रतिसाद लक्षात येतो.

शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. याचा अर्थ शासकीय खरेदीवर शेतकऱ्यांचा भरवसा राहलेला नसेल किंवा बाजारात त्यापेक्षा चांगला भाव मिळेल ही आशा शेतकऱ्यांच्या मनात असावी. राज्य सरकारने तातडीने या बाबतीत पावले उचलून शेतकऱ्यांच्या मनात खरेदीविषयी विश्‍वास निर्माण करावा. किंबहुना, याहीपेक्षा शेतकऱ्यांना सरसकट भाव फरक जाहीर करून तो भाव फरक सरळ सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा.
- डॉ. सत्येंद्र भुसारी, माजी सभापती, बाजार समिती, चिखली, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com