Ginger Food Processing  Agrowon
ॲग्रो विशेष

Ginger Food Processing : आल्यापासून पावडर, मुरंबा, कॅण्डी

Team Agrowon

सुहासिनी केदारे, डॉ.अनुप्रीता जोशी, डॉ. आर.बी.क्षीरसागर

Health Benefits of Ginger :

पावडर निर्मिती

सर्वप्रथम आले स्वच्छ धुऊन घ्यावे. त्यानंतर जिंजर ब्लांचिंग यंत्रामध्ये मध्ये ११० ते १३० अंश सेल्सिअस तापमानात ५ ते १० मिनिटे उकळून घ्यावे. नंतर जिंजर स्लाइसिंग यंत्राचा वापर करून बारीक काप करावेत. वाळविण्यासाठी ओव्हनचा वापर करावा. तीन ते सात तासांसाठी ७० ते ९० अंश सेल्सिअस तापमानात पूर्ण कोरडे होईपर्यंत वाळवावे. वाळलेल्या आल्याच्या कापांना ग्राइंडिंग यंत्रामध्ये टाकून पावडर  तयार करावी.

सुंठ निर्मिती

मलबार पद्धत

स्वच्छ केलेले आले सुमारे ८ ते १० तास पाण्यात ठेवले जाते. त्यानंतर त्याची साले काढून २ टक्के चुन्याच्या द्रावणात ६ ते ७ तास भिजत ठेवले जाते. त्यांना द्रावणातून काढून बंद खोलीत ठेवले जाते.त्यानंतर १२ तास गंधकाची धुरी देण्यात येते. त्यानंतर कंद बाहेर काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा तास भिजत ठेवतात. परत १२ तास गंधकाची धुरी देतात. ही पद्धती तीन वेळा करावी लागते, यामुळे आल्याच्या कंदांस पांढरा रंग प्राप्त होतो. प्रक्रिया केलेल्या आल्यास सूर्यप्रकाशामध्ये वाळवले जाते. गोणपाटामध्ये घालून स्वच्छ  केले  जाते.

चिप्स

घटक ः १५० ग्रॅम आले,४०० ग्रॅम साखर, ४० ग्रॅम तुळस, १ ते २ लिटर पाणी

कृती:

आले आणि तुळस स्वच्छ धुऊन घ्यावी. साल काढून त्याचे चाकूच्या मदतीने बारीक असे काप बनवावेत.

एक लिटर पाण्यामध्ये बारीक चिरलेले आल्याचे काप टाकून थोडा वेळ उकळू द्यावेत. चाळणीच्या मदतीने पाणी काढून टाकावे.

४०० ग्रॅम साखरेत ५०० लिटर पाणी टाकून त्याचा पाक बनवावा. त्यामध्ये तुळशीच्या पानांचा रस मिसळावा. हे मिश्रण रात्रभर ठेवावे. दुसऱ्या दिवशी एका कापडावर पूर्ण प्रकारे वाळू द्यावे.

चहा

घटकः एक कप पाणी, दोन चमचे साखर, आल्याचा तुकडा, एक चमचा चहा पावडर.

कृती: पातेल्यात एक कप पाणी टाकून गॅसवर ठेवावे. त्यात चहा पावडर आणि साखर टाकून गरम करावे. त्यात स्वच्छ आल्याचे बारीक केलेले काप टाकून उकळावे.

पाक वडी

घटक : २५० ग्रॅम आले, २५० ग्रॅम साखर, चिमूटभर मीठ, २ ग्रॅम मीठ, अर्धा लिंबू रस.

कृती:

आले स्वच्छ धुऊन साल काढावी. आले बारीक चिरून तितक्याच प्रमाणात साखर मिसळून मिक्सरच्या साह्याने मिश्रण बारीक करावे.

गॅसवर कढईत तूप गरम करून त्यामध्ये आले, साखरेचे मिश्रण घालावे. चवीपुरते मीठ आणि लिंबू रस घालून मिश्रण दहा ते पंधरा मिनीट शिजवावे. मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत गॅसच्या मंद आचेवर शिजवावे.

मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करावा. मिश्रण थोडे थंड झाले की एका ट्रे मध्ये तूप लावून त्यावर हे मिश्रण पसरून त्याच्या वड्या तयार कराव्यात. हे मिश्रण पूर्ण प्रकारे थंड झाल्यास वड्या, ट्रे मधून काढून घ्याव्या. साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर करावा.

मुरंबा

घटक : २५० ग्रॅम किसलेले आले, ५०० ग्रॅम साखर, २ कप पाणी, १ चमचा लिंबू रस, २,३ कुटलेले वेलदोडे.

कृती:

आले स्वच्छ धुवून साल काढून किसून घ्यावे. एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात किसलेले आले मिसळावे. ५ ते १० मिनीट उकळावे. त्यामुळे आले मऊ होईल. उकळलेले आले चाळणी ठेऊन पाणी गाळून घ्यावे.

एका जाड बुडाच्या भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करावे. मध्यम आचेवर ठेवून साखर विरघळू द्यावी.साखरेचा पाक तयार झाल्यावर त्यात उकळलेले आले मिसळावे. हे मिश्रण मंद आचेवर शिजू द्यावे.

मुरंबा शिजताना त्यात लिंबाचा रस मिसळावा. केशर, वेलदोडे मिसळून मुरंबा चांगला एकत्र करावा.मुरंबा घट्ट, चमकदार झाल्यावर गॅस बंद करावा. थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरावा.

कँडी

घटक : २५० ग्रॅम आले, १ कप साखर, २ कप पाणी, १ चमचा लिंबाचा रस, साखर

कृती:

आले स्वच्छ धुवून साल काढून छोटे तुकडे करावेत. एका भांड्यात पाणी गरम करून आल्याचे तुकडे मिसळून १० ते १५ मिनिटे उकळावे. यामुळे आल्याचे तुकडे मऊ होतात.उकळलेले आले चाळणी ठेऊन पाणी गाळून घ्यावे.

एका जाड बुडाच्या पातेल्यात २ कप पाणी आणि साखर एकत्र करून मध्यम आचेवर ठेवावे. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत हलवत राहावी. साखरेचा पाक तयार झाल्यावर त्यात उकळलेल्या आल्याचे तुकडे मिसळून मंद आचेवर शिजवावे.

पाक घट्ट होईपर्यंत आणि आलं तुकडे पाकाने पूर्णपणे मुरेपर्यंत शिजवावे. यात लिंबाचा रस घालावा. आल्याचे तुकडे पाकातून काढून गाळून घ्यावेत. एका ताटात किंवा ट्रे मध्ये पसरावेत. हे तुकडे थोडेसे वाळवून त्यावर साखरेचे कोटिंग करावे. कँडी पूर्णपणे थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या डब्यात भरावी.

लोणचे

घटक : स्वच्छ धुवून, साल काढून बारीक चिरलेले २५० ग्रॅम आले, १ कप लिंबाचा रस, २ चमचे मोहरीचे तेल, १ चमचा मोहरी,१ चमचा जिरे,१ चमचा हळद, १ चमचा मिरची पावडर, १ चमचा हिंग, मीठ चवीनुसार

कृती:

आले स्वच्छ धुवून सोलून बारीक चिरावे. एका स्वच्छ आणि कोरड्या बाऊलमध्ये चिरलेले आले आणि लिंबाचा रस एकत्र करावा. हे मिश्रण २ ते ३ दिवस झाकून ठेवावे. यामुळे आले लिंबाच्या रसात मुरते.

२ ते ३ दिवसानंतर आले आणि लिंबाचा रस मिश्रणात हळद, मीठ आणि मिरची पावडर घालून एकत्र करावे.

एका कढईत मोहरीचे तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालून फुटू द्यावी. त्यानंतर जिरे आणि हिंग घालून चांगले परतून घ्यावे. हे मिश्रण आले आणि लिंबाच्या मिश्रणात चांगले एकत्र करावे.

तयार झालेले आले लोणचे एका स्वच्छ, कोरड्या काचेच्या बरणीत भरावे. काही

दिवस ठेवून द्यावे, जेणेकरून लोणचे चांगले मुरेल.

आल्याचे तेल

उपयोग:

डोके दुखत असल्यास हलक्या हाताने मसाज करावा. सांधे दुखत असल्यास लावावे.

थंडीत त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तेल लावावे.

आले तेल नियमित वापरल्याने त्वचा, केसांना पोषण मिळते, सांधे व स्नायूंचा त्रास कमी होतो.

ओलिओरेझिन

आल्यातील आवश्यक तेल, रेझिनचे एक मिश्रण आहे.

उपयोग:

खाद्य पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरतात.

औषधी उपयोग,पचन सुधारणा, दाह कमी करणे, सुगंधी तेल

आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जाते.

- डॉ.अनुप्रीता जोशी, ९६३७२४०४०६९, (सहायक प्राध्यापिका, अन्न तंत्र महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Green Soybean : हिरव्या सोयाबीनचा आहारात वाढवा वापर

World River Day : चला साजरा करूयात नद्यांचा उत्सव

NAFED Issue : नाफेडचा पर्याय शेतकऱ्यांच्या माथी मारू नका

Infestation Rice & Sugarcane : शेतकरी दुहेरी संकटात, भातावर खोड किड तर उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT