Ginger Food Processing : आल्यापासून पावडर, कॅण्डी, ज्यूस

Ginger Food : आल्यापासून कँडी,मुरंबा, पावडर, पेस्ट,ज्यूस, तेल निर्मिती करता येते. मसालेदार चव आणि आल्हाददायक सुगंधामुळे आल्याचा वापर पेय, ब्रेड, सूप, लोणचे आणि अनेक शीतपेयांमध्ये चवीसाठी केला जातो.
Ginger
Ginger Agrowon
Published on
Updated on

कृष्णा काळे,अनिता लघुळकर

आल्यापासून कँडी,मुरंबा, पावडर, पेस्ट,ज्यूस, तेल निर्मिती करता येते. मसालेदार चव आणि आल्हाददायक सुगंधामुळे आल्याचा वापर पेय, ब्रेड, सूप, लोणचे आणि अनेक शीतपेयांमध्ये चवीसाठी केला जातो. प्रक्रिया उद्योगामध्ये अर्क, ओलिओरेसिनचा वापर करतात.

पोषकद्रव्ये (प्रती १०० ग्रॅम )

पाणी- ९.४ ग्रॅम

प्रथिने -९.१ ग्रॅम

ऊर्जा -३४७ किलो कॅलरी

चरबी-६.० ग्रॅम

एकूण कर्बोदके -७०.८ ग्रॅम

तंतूमय घटक -५.९ ग्रॅम

Ginger
Ginger Cultivation : बियाणे दरामुळे आल्याचे लागवड क्षेत्र घटण्याची शक्यता

पावडर :

आले चांगले धुवून, सोलून त्याचे पातळ तुकडे करावेत. त्यानंतर रॅकवर तुकडे ठेवावेत. तापमान नियंत्रित खोलीत तुकडे पूर्णपणे निर्जलीकरण होईपर्यंत अनेक दिवस वाळवले जातात. हा टप्पा महत्त्वाचा आहे, कारण आल्याची चव आणि सुगंध टिकवून ठेवण्यास मदत होते.

तुकडे कोरडे झाल्यावर यंत्राने बारीक पावडर बनवतात. ही पावडर प्लास्टिकच्या पिशवी किंवा पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये पॅक केले जाते. लेबल करून सीलबंद केली जाते.

कँडी:

हिरवे आले ५ ते ६ महिन्यांचे असताना काढावे. हे व्यवस्थित धुऊन आवश्यक एकसमान आकाराचे तुकडे करावेत. नंतर ते दोन टप्प्यांत पाण्यात उकळले जाते. पहिला टप्पा ५ मिनिटे आणि दुसरा टप्पा १० मिनिटांसाठी ठेवावा. प्रत्येक टप्प्यानंतर जास्तीचे पाणी काढून टाकावे. यामुळे आल्याचा तिखटपणा कमी होतो. हे आल्याचे तुकडे उकळत्या साखरेच्या द्रावणात मिसळावेत.

एक किलो आल्यावर प्रक्रियेसाठी ६०० ग्रॅम साखर आणि २५० मिलि पाण्यात ४ ग्रॅम सायट्रिक ॲसिड लागते. - या मिश्रणातील पाण्याचे जास्तीत जास्त बाष्पीभवन होईपर्यंत उकळावे. त्यानंतर गरम करणे थांबवावे आणि उर्वरित द्रावण काढून टाकावे. त्यानंतर तयार कँडी बाहेर काढून ७५ अंश सेल्सिअस तापमानात सुमारे ४ तास गरम एअर ड्रायरमध्ये ठेवावी. यानंतर तीन तास कॅण्डी सामान्य तापमानात गार करत ठेवावी. कॅण्डी करून शिल्लक राहिलेला पाक पुन्हा वापरता येतो.

Ginger
Ginger Rate : आल्याच्या दरात सुधारणा

ज्यूस:

आल्याचे तुकडे चांगल्या प्रकारे धुवून सोलून ग्राईंडरच्या साहाय्याने पेस्ट करावी. नंतर फिल्टर कापडातून रस गाळून घ्यावा.

ज्यूस तयार करण्यासाठी साखरेचे द्रावण ( १ लिटर पाणी अधिक २०० ते ३०० ग्रॅम साखर) तयार करावे. हे द्रावण आल्याच्या रसात मिसळावे.

सुमारे ६० मिलि गाळलेला रस एक लिटर सिरपमध्ये मिसळावा. या मिश्रणात १० ग्रॅम सायट्रिक ॲसिड आणि ४० मिग्रॅ केएमएस मिसळावे. त्यानंतर २० मिनिटांसाठी १०० अंश सेल्सिअस तापमानात उकळावे. ज्यूसचे निर्जंतुकीकरण झाल्यावर बाटलीमध्ये पॅक करावे.

सरबत:

५० ग्रॅम बारीक चिरलेले आले साखरेच्या पाकात (दोन कप पाण्यात एक कप साखर) उकळावे.

हे मिश्रण एक तास शिजवावे. त्यानंतर हे द्रावण गाळावे. त्यामध्ये चवीनुसार व्हॅनिला किंवा लिंबू रस मिसळावा. या सरबताचे चांगले पॅकिंग करावे.

संपर्क : कृष्णा काळे, ८८०५९६८५३६

(अन्नप्रक्रिया तज्ञ आहेत)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com