Ginger Benefits : आल्याचे औषधी महत्त्व...

Healthy Ginger : कच्चे आले पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कच्च्या आल्याचा आहारात समावेश केल्याने पोटदुखी सारख्या समस्यादेखील उद्भवत नाहीत. तुम्ही जर पोटदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर कच्च्या आल्याचे सेवन करावे.
health benefits of ginger
health benefits of ginger
Published on
Updated on

सुहासिनी केदारे, डॉ.अनुप्रीता जोशी

Ginger : कच्चे आले पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कच्च्या आल्याचा आहारात समावेश केल्याने पोटदुखी सारख्या समस्यादेखील उद्भवत नाहीत. तुम्ही जर पोटदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर कच्च्या आल्याचे सेवन करावे. मायग्रेनच्या दुखण्यामध्ये कच्चे आले खूप फायदेशीर मानले जाते. थकवा जाणवत असल्यास कच्चे आले खूप फायदेशीर आहे. आल्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येते. कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करणाऱ्यांसाठी कच्चे आले फायदेशीर ठरते.कच्चे आले रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

जाती ः
मारन, कुरुप्पमपाडी, एर्नाड, वायनाड, हिमाचल, नादिया, रिओ डी जनेरियो या वैशिष्टपूर्ण जाती आहेत. ‘आयआयएसआर वरदा’ ही ताजे आले, कोरडे आले आणि कँडी बनवण्यासाठी उपयुक्त आहे. ‘आयआयएसआर रेजाथा’ आवश्यक तेलाने समृद्ध आहे.
१. इंग मखिर: मेघालयातील ही जात असून उच्च प्रतीचे झिंजेरॉल असते. पावडरीसाठी या जातीला पसंती आहे.
२. थिंगपुई: मिझोरम या राज्यातील ही जात चव आणि सुगंधासाठी प्रसिद्ध आहे.
३. वायनाड: ही जात तिखट चवीसाठी प्रसिद्ध आहे.
४. मारन: ही जात तेल आणि ओलिओरेसिनसाठी उपयुक्त आहे.
५. नादिया: लिंबासारखी चव असते. कोरडे आणि ताजे आले म्हणून वापरतात.
६. सुप्रभा: ओदिशा राज्यातील ही जात आहे. तंतूमय घटक कमी प्रमाणात असतात.
७. रिओ डी जनेरियो: स्थानिक जातीपेक्षा जास्त उत्पादन देणारी जात आहे. कोरड्या आल्यासाठी उपयुक्त जात आहे.


health benefits of ginger
Ginger Side Effect : आल्याचे अतिसेवन आरोग्याला घातक जाणून घ्या तोटे

सोलणे ः
आले लवकर वाळवण्यासाठी आणि चव, सुगंध टिकवण्यासाठी सोलणे महत्त्वाचे आहे. पूर्णपणे परिपक्व झालेल्या आल्याच्या बाह्य त्वचेला बांबूच्या टोकदार काठीने स्क्रॅप करून काढले जाते. यामुळे बाह्य त्वचेच्या खालील तेलधारण करणाऱ्या पेशींचे नुकसान होत नाही. चाकूने खोल खरवडल्याने तेलाचे प्रमाण कमी होते, त्यामुळे असे सोलणे टाळावे. सोललेले आले वाळवण्यापूर्वी धुतले जाते. त्यामुळे कोरडे झालेले आले सुगंधी, चविष्ट आणि तिखट होते.

वाळवणे
काढणीच्यावेळी ताज्या आल्यातील आर्द्रता सुमारे ८० ते ८२ टक्के असते, जी सुरक्षित साठवणुकीसाठी १० टक्क्यांपर्यंत कमी करावी लागते. आले एकाच थरात पसरवून उन्हात वाळवले जाते. आले पूर्ण वाळण्यासाठी ८ ते १० दिवस लागतात.

पॉलिश, स्वच्छता, प्रतवारी ः
वाळवलेल्या आल्यास पॉलिश करावे लागते. त्यानंतर आकारानुसार प्रतवारी केली जाते. उच्च घनतेच्या पॉलिथिलीन पिशवीमध्ये ठेऊन हवाबंद कंटेनरमध्ये साठवतात. दोन वर्षांहून अधिक काळ आले साठवल्यास सुगंध, चव आणि तिखटपणा कमी होतो.

संपर्क ः डॉ.अनुप्रीता जोशी, ९६३७२४०४०६९
(सहायक प्राध्यापिका, अन्न तंत्र महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com