Water Testing Agrowon
ॲग्रो विशेष

Water Testing : एफटीके किटद्वारे आता गावोगावी पाण्याची तपासणी

Water Quality : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची रासायनिक व जैविक गुणवत्ता तपासण्यासाठी पाणी गुणवत्तातपासणी, जनजागृती मोहीम सुरू झाली आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची रासायनिक व जैविक गुणवत्ता तपासण्यासाठी पाणी गुणवत्तातपासणी, जनजागृती मोहीम सुरू झाली आहे. ७ जून २०२५ पर्यंत क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे (एफ.टी.के) पाणी गुणवत्ता तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व १५७५ गावांत ही मोहीम राबवून नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अहिल्यानगरला जिल्हा परिषदेत पाणी गुणवत्ता तपासणी मोहिमेचा शुभारंभ झाला. या वेळी पाणी व स्वच्छता विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पाणी गुणवत्ता तपासणी मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार गावपातळीवर एफटीके. संचाद्वारे रासायनिक व जैविक तपासणीसह जनजागृती अभियान राबविले जाणार आहे.

यामध्ये गावांमध्ये पाणी तपासणीसाठी निवडलेल्या व संकेतस्थळावर नोंदविलेल्या पाच महिलांची पडताळणी, प्रशिक्षण नोंदी, तसेच आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना एफ.टी.के. किटद्वारे प्रात्यक्षिके देण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या साह्याने शाळा, अंगणवाड्या, घरगुती नळजोडण्यांतील पाण्याचे नमुने तपासले जातील. संबंधित माहिती ‘डब्ल्यूक्यूएमआयएस’ पोर्टलवर नोंदविली जाईल. नळ पाणीपुरवठा योजनांचे स्रोत, शाळा, अंगणवाड्या व घरगुती नळजोडण्यांची तपासणी करण्यासाठी रासायनिक व जैविक एफ.टी.के. संचांचे वाटप करण्यात येईल. स्थानिक नागरिकांना पाणी गुणवत्ता तपासणीचे महत्त्व व त्याचे फायदे सांगण्यात येणार आहेत. या मोहिमेची जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतस्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल.

या संपूर्ण कालावधीत १५७५ गावांमध्ये एफ.टी.के.द्वारे पाणी गुणवत्ता तपासणी करण्यात येणार आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. या मोहिमेमध्ये ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, व पाणीपुरवठा विभाग सहभागी होणार असून सर्वांच्या समन्वयाने ही व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

काय आहे एफटीके?

एफटीके (स्थळ तपासणी संच) हा एक पोर्टेबल तपासणी संच आहे. या किटद्वारे पिण्याच्या पाण्यातील पीएचस्तर, क्लोरिन, नायट्रेट्स, फ्लोराइड, क्लोराइड, लोह, अल्कॉलिनिटी, गढूळपणा, हार्डनेस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम तसेच जैविक प्रदूषणाची तत्काळ तपासणी करता येते. यामुळे गावपातळीवर नागरिकांना पाण्यातील अशुद्धता ओळखता येते व आवश्यक उपाययोजना शक्य होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beej Bhandval Karj Yojana: गरीब आणि गरजू कुटूंबाना सरकारकडून मिळतयं ७ लाख रुपये कर्ज; पाहूयात काय आहे अर्ज प्रक्रिया

Khandesh Heatwave: खानदेशात उष्णतेचा तडाखा कायम

Maharashtra Cabinet Decisions: शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Agrowon Podcast: तुरीच्या भावावरील दबाव कायम; सोयाबीन टिकून, कापूस स्थिर, जांभळाला मागणी तर ज्वारी आवक सुधारली

Summer Soybean Production: खानदेशात उन्हाळी सोयाबीनच्या उत्पादनात घट

SCROLL FOR NEXT