
Irrigation Water : आपल्या शेतातील पाणी पिकासाठी योग्य आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी पाण्याची तपासणी करण अत्यंत गरजेच आहे. कारण पाणी जर खराब असेल तर त्याचा परिणाम पिकावर आणि जमिनीवरही होतो. पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी शेतातील मातीप्रमाणे पाण्याचंही परिक्षण कराव लागत.
सिंचनासाठी पिकासाठी परीक्षण न करता वापरलेल्या पाण्याचे पिकांच्या वाढीवर, जमिनीच्या गुणधर्मावर तसेच उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होतात. अनेक ठिकाणी जमिनी क्षारयुक्त होऊन त्यांची उत्पादन क्षमता कमी झालेली पाहायला मिळते. त्यात मध्यम काळ्या तसेच काळ्या जमिनीत पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन तसेच पाण्याच्या गुणवत्तेविषयी ज्ञानाचा अभाव या बाबींची भर पडली आहे. ही समस्या प्रामुख्याने ऊस पट्ट्यात जास्त आहे.
शेतात सिंचनासाठी वापरायच्या पाण्याची प्रत ही त्यामध्ये असणाऱ्या क्षारांचे प्रमाण, पाण्याचा सामू यावर अवलंबून असते. सिंचनाच्या पाण्यामध्ये विद्राव्य क्षारांचे प्रमाण जास्त झाल्यास पिकांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. शिवाय जमिनीचे आरोग्यदेखील चांगले राहत नाही. त्यामुळे चांगल्या प्रतीचे पाणी सिंचनासाठी वापरणे आवश्यक आहे.
परिक्षणासाठी पाण्याचा नमुना कसा घ्यावा?
१) पाण्याची तपासणी करण्यासाठी साधारणपने अर्धा लिटर पाण्याचा नमुना पुरेसा होतो. पाण्याचा नमुना घेताना नमुना स्वच्छ प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बाटलीत घ्यावा.
२) विहिरीतून पाण्याचा नमुना घेताना विहिरीच्या मध्य भागातील पाणी बादलीने ढवळून काही बादल्या पाणी बाहेर उपसून टाकल्यानंतर पाण्याचा नमुना घ्यावा. बोअरच पाणी असेल तर पाणी घेताना १० ते २० मिनिटे एकसारखी मोटार चालवून नंतर स्वच्छ प्लॅस्टिक किंवा काचेच्या बाटलीत पाणी नमुना घ्यावा.
३) नदी, ओढे, कालवा यांच्यामधील पाण्याचा नमुना घेताना वाहत्या पाण्यामधून मध्य भागातील नमुना घ्यावा.
४) नमुना बाटलीत भरण्यापूर्वी बाटली त्या पाण्याने दोन ते तीन वेळा विसळून घ्यावी. मग यातील पाणी घट्ट बूच बसवून २४ तासांच्या आत प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवावे.
५) बाटलीसोबत शेतकऱ्याचे नाव व नमुना कशातून घेतला याबाबतची सविस्तर माहिती लिहिलेले लेबल बाटलीला लावावे.
६) पाण्याचा प्रातिनिधिक नमुना घेतल्यानंतर तपासणी अहवालानुसार सामू म्हणजेच आम्ल-विम्ल निर्देशांक हा सर्वसाधारण किंवा विम्लधर्मी आहे कळते. म्हणजे पाण्याचा सामू जर ६.५ ते ८ असेल तर असं पाणी जमिनीला आणि पिकांनाही चांगल असत. तर हा सामू जर ८ पेक्षा जास्त असेल तर अस पाणी हे पिकाला आणि जमिनीलाही चांगल नसत.
प्रयोगशाळेत पाण्याची तपासणी झाल्यानंतर पाण्याच्या पृथक्करण अहवालानुसार त्यामध्ये असणाऱ्या क्षारांचे प्रमाण, विद्युत वाहकता, सोडिअम, सोडिअम कार्बोनेट च्या प्रमाणावर पाण्याची प्रत ठरविली जाते. त्यामुळे चांगल्या पीक उत्पादनासाठी तुम्हीही शेतातील पाण्याच परिक्षण कराचं.
माहिती आणि संशोधन - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.