
Buldana News : राज्यामध्ये फिल्ड टेस्ट किटच्या माध्यमातून गावातच पाणी गुणवत्ता तपासणी मोहीम राबविली जात आहे. २ ते ७ जून दरम्यान ही मोहीम ग्रामपंचायत स्तरावर राबविण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतीमध्ये ही मोहीम रावबिली जाणार आहे.
विशेष म्हणजे एफटीकेद्वारे म्हणजेच पाणी तपासणीच्या फिल्ड टेस्ट किटद्वारे पाणी गुणवत्ता गावातच तपासली जाणार आहे. ही मोहीम यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले आहे.
यामध्ये सर्व संबंधित विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग, शिक्षण विभाग या सर्वांना सक्रिय सहभागी होण्यासाठी सुचित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायत मध्ये एफटीकेद्वारे म्हणजेच पाणी तपासणीच्या फिल्ड टेस्ट किटद्वारे पाणी गुणवत्ता गावातच तपासली जाणार आहे.
यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत मधील पाच निवडक महिलांची या कामासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. यामध्ये पी.एच., क्लोरीन, नायट्रेट्स, फ्लोराइड, क्लोराईड, लोह, अल्कलिनिटी, गढूळपणा, हार्डनस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम या रासायनिक तसेच जैविक घटकांची तपासणी केली जाते. याचा लगेच निकाल (प्राथमिक स्तरावर) मिळतो.
पाण्याची गुणवत्ता तपासणार
या मोहिमेअंतर्गत गावात पाणी तपासणी करण्यासाठी निवड केलेल्या व संकेतस्थळावर नोंदविलेल्या पाच महिलांची पडताळणी करणे, महिलांकडून होणाऱ्या पाणी गुणवत्ता विषयक एफटीके प्रशिक्षणाच्या नोंदी घेणे, पोर्टलवरील नोंदी घेणे, नळ पाणीपुरवठा योजना स्त्रोत, घरगुती नळ जोडण्या, शाळा अंगणवाड्यांची पाणी गुणवत्ता तपासणी करण्यासाठी रासायनिक व जैविक एफटीके संचाचे वाटप करणे, स्थानिकांना पाणी गुणवत्ता तपासणी व त्यापासून होणारे फायदे यादरम्यान सांगितले जाणार आहेत.
शालेय विद्यार्थ्यांना पाणी स्वच्छतेचे महत्त्व समजावे, यासाठी या मोहीत विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेतले जाणार आहे. यात गावात आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांना एफटीकेद्वारे पाणी तपासण्याचे प्रात्यक्षिक देणे, आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळा, अंगणवाड्या, घरगुती नळ जोडण्यामधील पाणी नमुने तपासणी करण्यात येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.