Rajaram Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Rajaram Sugar Factory : महादेवराव महाडिक यांच्याकडून 'राजाराम'ची एफआरपी जाहीर, परंतु दुसऱ्या हफ्त्यावर मौन

Mahadevrao Mahadik : राजाराम साखर कारखान्याकडून प्रतिटन तीन हजार रुपये दराची घोषणा संचालक, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केली.

sandeep Shirguppe

Kolhapur Rajaram Factory : कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखानदार एकरकमी उसाची एफआरपी जाहीर करत आहेत. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचा असलेल्या कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्याकडून प्रतिटन तीन हजार रुपये दराची घोषणा संचालक, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केली.

'राजाराम'च्या यंदाच्या हंगामाचा प्रारंभ महाडिक यांच्याहस्ते आज उसाची मोळी गव्हाणीत टाकून झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक, उपाध्यक्ष नारायण चव्हाण उपस्थित होते.

महाडिक म्हणाले, 'यंदा पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तोडणी वाहतूक यंत्रणा आणि कामगारांच्या सहकार्याने उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण करू. आपला कारखाना खासगीतून सहकारी झाला आहे. कार्यक्षेत्र १२२ गावांत ७ तालुक्यांत विखुरले आहे. त्यामुळे सर्व गावांतून सभासद, बिगरसभासदांचा ऊस आणावा लागतो. त्यामुळे तोडणी वाहतुकीचा खर्च जादा येतो.

स्वमालकीची पाणीपुरवठा योजना नसल्याने हक्काचा ऊस उपलब्ध नाही. तरीही कार्यक्षेत्रातील नोंदीतील संपूर्ण ऊस आणून काटकसरीने कारखाना सुरू आहे.' हंगामातील नोंदीत संपूर्ण ऊस मुदतीत गाळप होईल. पुरेशी तोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध असून यंदा नवीन ऊसतोडणी मशीन खरेदीसाठीही सहकार्य केले आहे.

सभासद, बिगरसभासदांनी नोंदविलेला संपूर्ण ऊस गळितास पाठवून हंगाम यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. महाडिक यांनी केले. कार्यक्रमास संचालकांसह कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, कार्यलक्षी संचालक नामदेव पाटील, माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी सभासद उपस्थित होते.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली. परंतु मागच्या काही दिवसांपासून माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अनेक शेतकरी संघटनांनी मागील गळीत हंगामातील उसाला ४०० रुपये दुसरा हफ्ता द्यावा अशी मागणी केली आहे. यावर एकाही कारखान्याने या मागणीवर कोणतेही भाष्य केले नाही.

मागच्या दोन दिवसांपूर्वी राजाराम कारखान्याने दुसऱ्या हफ्त्याची कोंडी फोडावी असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदन दिले होते परंतु यावर राजाराम कारखान्याच्या अध्यक्षांनी बोलण्याचे टाळले. दरम्यान कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात वाद वाढण्याची शक्यता आगामी काळात पहायला मिळू शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT