Rajaram Sahakari Sakhar Karkhana : महाडिक गटाला धक्का, राजाराम सहकारी साखर कारखान्यात शौमिका महाडिकांसह १२७२ सभासद अपात्र

Rajaram Sugar Factory : प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने कायदेशीर बाबी तपासून गुणदोषावर आदेश देत १२७२ सभासदांना अपात्र ठरवण्यात आले.
Rajaram Sahakari Sakhar Karkhana
Rajaram Sahakari Sakhar Karkhanaagrowon

Rajaram Sugar Factory : मागच्या ५ महिन्यांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्याची अत्यंत चुरशीने निवडणूक पार पडली. दरम्यान आमदार सतेज पाटील यांनी राजाराम कारखान्यातील सत्ताधारी यांच्यावर बोगस सभासदांची नोंद केल्याचा आरोप केला होता.

यावर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने कायदेशीर बाबी तपासून गुणदोषावर आदेश देत 1272 सभासदांना अपात्र ठरवले आहे. यामध्ये महाडिक यांच्या कुटुंबातील १० जणांचे सभासदत्व रद्द झाले आहे. याचबरोबर शौमिका महाडिक याही अपात्र ठरल्या आहेत.

दरम्यान आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ते म्हणाले की, प्रादेशिक सहसंचालक यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासून गुणदोषावर आदेश देत १२७२ सभासदांना अपात्र ठरवले आहे. यामध्ये शौमिका महाडिक यांचाही समावेश आहे. त्याशिवाय महाडिक परिवारातील एकूण १० जण अपात्र झाल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली.

प्रादेशिक सहसंचालक यांनी कोल्हापूर येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र ठरवले आहेत. प्रादेशिक सहसंचालक यांनी हा निर्णय दिला आहे. तसेच फेर निवडणूक घ्यावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली.

मार्च व एप्रिल 2023 मध्ये कारखान्याची निवडणूक झाली. यामध्ये कारखान्याच्या सत्तारुढ आघाडीने निवडणुक अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकला होता. यावेळी आमच्या आघाडीच्या इच्छूक उमेदवारांपैकी ३० जणांचे उमेदवारी अर्ज छाननीतून बेकायदेशीरपणे अवैध ठरवले होते. आमचे ३० तगडे उमेदवार निवडणूक रिंगणाबाहेर घालविले. तरीसुध्दा सर्वसामान्य सभासदांच्या पाठबळावर आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो.

या निवडणुकीमध्ये एकूण १२ हजार ३३६ इतके मतदान झाले. त्यामध्ये या अपात्र सभासदांच्या मतदानाचा समावेश होता. म्हणजे नियमित ११ हजार सभासदांचे मतदान झाले होते. यापैकी ५ हजार ते ५ हजार ५०० मते आमच्या आघाडीला मिळाली. त्यामुळे खऱ्या सभासदांचा कौल आमच्या आघाडीला मिळाला होता हे सिध्द झाले आहे.

या अपात्र सभासदांमुळे आमच्या उमेदवारांना १२०० ते १२५० मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. जर हे अपात्र सभासद मतदानास पात्र झाले नसते तर आज कारखान्यावर आमचीच सत्ता असती हे सुर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे. अशी माहिती सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com