Kolapur News : वारणानगर येथील वारणा सहकारी दूध संघामार्फत दिवाळीसाठी उत्पादकांना दूध फरक बिल, दूध बिल, कामगारांना पगार व बोनस अशी तब्बल ७५ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी मंगळवारी (ता. ३१) केली.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
डॉ. कोरे म्हणाले, की दूध उत्पादकांना दिवाळीचा बोनस फरकबिल म्हणून देण्याची पद्धत वारणाने राज्यात सर्वप्रथम सुरू केली. त्यानंतरच वारणाची ही परंपरा राज्यात रुढ झाली. वारणा दूध संघाने दीपावलीनिमित्ताने दूध उत्पादकांना म्हैस दुधासाठी प्रतिलिटर २ रुपये ३० पैसे इतके उच्चांकी फरक बिल देण्याचा निर्णय संघाच्या संचालक मंडळाने घेतला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी उत्पादकांच्या खात्यावर फरक बिल, दूध बिल, कामगारांचा बोनस जमा केले जाणार आहे.
कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जनावरांकरिता माफक दरात पशुवैद्यकीय सेवा पुरविण्याबरोबरच ८० हजारांहून अधिक जनावरांचे मोफत लम्पी स्कीन प्रतिबंधक लसीकरण केले आहे. संघाकडून अमृत पशुधन सुरक्षा कवच योजनेतून सुमारे ५३ लाख रुपयांचा लाभ उत्पादकांना दिला आहे. विविध विस्तार सेवेच्या माध्यमातून सुमारे ७१ लाख १८ हजार रुपयांचे अनुदान देऊन दूध उत्पादकांना आर्थिक पाठबळ दिले आहे. सायलेज बेलिंग मशीन खरेदी करून माफक दरात वैरण वितरण करण्यात आली आहे. बिहार राज्यातील दूध संघाना दूधपुरवठा, भारतीय संरक्षण दलास दूध व दुग्धपदार्थ पुरवठा, महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण व आदिवासी विभागास दूधपुरवठा, मुंबई मेट्रो स्टेशनवरील विविध स्टेशन वरती विक्री प्रारंभ आदी कामे केली आहेत. बाजारात वारणाच्या दूध व दुग्धपदार्थांना मागणी वाढली असून राज्य तसेच राज्याबाहेरील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे व विक्रीत वाढ झाल्याचे डॉ. कोरे यांनी सांगितले.
संघाकडे दूध हातळणीच्या वाढीव क्षमतेने आधुनिक असा मुख्य दुग्धालय विस्तारीकरण प्रकल्प कार्यान्वित झाला असून संघाने नुकतेच अल्मोंड, फ्रूट, कॅश्यु, ओसमानिया या प्रकारात बिस्किट्स तसेच गुलाबजामून, रसगुल्ला, चोको चीप कुकिज, माल्टेड फूड मिल्क स्टॅमिना, इलायची श्रीखंड या पदार्थाचा विक्री प्रारंभ केला आहे त्याची विक्री बाजारात चांगली होत आहे.
दूध संघाशी संलग्न असणाऱ्या तात्यासाहेब कोरे दूध-साखर वाहतूक संस्था, सावित्री महिला औद्योगिक संस्था,अमृत सेवक पतसंस्था व डॉ. आर. ए. पाटील पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना एकाचवेळी बोनस देण्यात येणार असल्याचे संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले. या वेळी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, मुख्य अकाउंट्स मॅनेजर सुधीर कामेरीकर, अकांउंटस् ऑफिसर प्रवीण शेलार, संकलन व्यवस्थापक डॉ. अशोक पाटील, मार्केटिंग मॅनेजर अनिल हेर्ले उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.