Kolhapur Farmer News : कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक महामार्गांचे काम सुरू आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जागा हस्तातरीत करण्याचे काम सुरू असल्याने शेतजमीनींचे नुकसान होत आहे. दरम्यान कोल्हापूर -गगनबावडा रस्त्याचे काम सुरू आहे. रुंदीकरणाच्या कामात स्थानीकांना त्रासाला सहन करावे लागत आहे. रस्त्याचे रुंदीकरण होत आहे परंतु शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळत नसल्याने काम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला.
या रस्त्याच्या रुंदीकरणात जाणाऱ्या शेतजमिनीची नुकसान भरपाई द्यावी, तरच काम सुरू करावे, या मागणीसाठी दोनवडे, सावळेवाडीतील शेतकरी आक्रमक झाले. रुंदीकरणाचे काम बंद पडणार, अशी भूमिका घेतल्यामुळे आज राज्य महामार्ग अधिकारी यांनी भेट दिली.
यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आठवड्याचा कालावधी दिला. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. पुलाच्या दक्षिणेला दोनवडेजवळ नवीन पूल बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शिंगणापूर फाटा ते कळेपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण होईल.
सध्या झाडे तोडल्यानंतर दुतर्फा रस्ता तयार केला आहे. या रस्त्यामध्ये बहुतांशी शेतकऱ्यांच्या ५० स्क्वेअर फुटांपासून दहा गुंठेपर्यंत जमिनी जाणार आहेत. आज दोनवडे पुलाजवळ मुरुम पसरून पूल बांधणीच्या कामाला सुरुवात झाली. हे समजताच आज दोनवडे, साबळेवाडीत शेतकरी विरोध करण्यासाठी पुलाजवळ एकत्र आले आणि कंत्राटदारांना धारेवर धरले.
भरपाईचे काय याबाबत जाब विचारत मुरूम पसरविण्याचे सुरू असलेले काम थांबविले. यावेळी प्रोजेक्ट मैनेजर विवेक देशमुख राज्य महामार्ग खात्याचे शुभम पाटील यांनी निर्णय देण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी मागितला. एका आठवड्यानंतर मोजणीची सर्व कागदपत्रे प्रांत कार्यालयात पाहून अहवाल मिळेल, असे सांगितले.
यावेळी शेतकरी विश्वास मोहिते, बाबासो मोहिते, दत्तात्रय पाटील, अतुल गडकरी, सतीश मोहिते, बाळासाहेब पाटील, सरदार पाटील व शेतकरी उपस्थित होते.
मागीलवर्षी जूनमध्ये रुदीकरणात जाणाऱ्या शेतजमिनीची मोजणी केली. यानंतर वर्षभर मोजणी आणि भरपाईबाबत राज्यमार्ग खात्याकडून किती क्षेत्र जाणार याबाबत माहिती दिलेली नाही. किती क्षेत्र जाणार, याबाबत भूमिअभिलेख खात्याकडून राज्य महामार्ग खात्याकडे मोजणी नकाशे, कागदपत्रे किंवा कोणत्याही सूचना दिलेल्या नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.
यावेळी स्थानिक शेतकऱ्याने आपले मत व्यक्त केले, गतवर्षी मोजणी केली. यावेळी आम्हाला नोटीस नाही, आता शेतजमिनीतून रस्ता गेला आहे. काही सरीवरचा ऊस होता तो आम्ही कापून घेतला आहे. रुंदीकरणात जाणाऱ्या शेतजमिनीची पुन्हा मोजणी करावी व भरपाई द्यावी. यानंतरच काम सुरू करावे. पंधरा दिवसांनंतर कार्यवाही न झाल्यास आंदोलन करून काम करू देणार नसल्याचा थेट इशारा शेतकऱ्यांनी दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.