Chandrashekhar Bavankule Agrowon
ॲग्रो विशेष

Mahayuti Meeting : महायुतीचे १४ जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांत संयुक्त मेळावे

Chandrashekhar Bawankule : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संयुक्त मेळावे होणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (ता.३) पत्रकार परिषदेत दिली.

Team Agrowon

Mumbai News : महाराष्ट्रात महायुतीच्या ४५च्या वर लोकसभा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी १४ जानेवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यांत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संयुक्त मेळावे होणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (ता.३) पत्रकार परिषदेत दिली.

महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीत येण्यासाठी रांगेत उभे आहेत. पुढील काळात तीन पक्षांत केवळ नेते शिल्लक राहतील, कार्यकर्ते नसतील, अशी बोचरी टीकाही बावनकुळे यांनी केली.या वेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, ‘‘जिल्हा, तालुका आणि बूथपातळीवर महायुतीचे मेळावे होणार असून, फेब्रुवारीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावे होतील. लोकसभेच्या जागावाटपात कोणत्याही पक्षाला कुठलीही जागा मिळाली तरी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते विजयासाठी अथक प्रयत्न करतील याचीही आम्ही काळजी घेऊ.

आम्ही ५१ टक्के मताधिक्क्याने ४५ पेक्षा जास्त जागा जिंकू तसेच आम्ही विधानसभा निवडणुकीत २२५ पेक्षा जास्त जागा जिंकू,’’ असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी विविध पक्षातील नेते रांगेत उभे असल्याचे सांगत ते म्हणाले, ‘‘ आघाडीमध्ये फक्त नेते असतील आणि त्यांच्याकडे लवकरच एकही कार्यकर्ता राहणार नाही. जागावाटपा संदर्भात केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य असेल.’’

सुनील तटकरे म्हणाले, ‘‘जानेवारीपासून महायुतीचे मेळावे होणार आहेत. या मेळाव्यांना एक हजार प्रमुख कार्यकर्ते असतील. १४ तारखेपासून सहा प्रादेशिक विभागात आम्ही मेळावे आयोजित केले आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही जाहीर मेळावे घेणार आहोत. ’’ मंत्री दादा भुसे म्हणाले, ‘‘देश पातळीवर अनेक चांगले निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतले आहेत. सरकारचे काम सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही विभाग, गाव पातळीवर महायुतीचे सर्व मेळावे आपण आयोजित करत आहोत.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT