Humani Pest Control agrowon
ॲग्रो विशेष

Humani Pest Control : हुमणी नियंत्रणासाठी, सहा ठिकाणी कामगंध सापळे, कोल्हापुरात प्रयोग

Crop Damage Humani : अंडी, अळी, कोष व भुंगे अशा चार अवस्थेतून जाते. पाऊस पडून गेल्यानंतर पाच ते दहा दिवसांतर भुंगे जमिनीवर येतात.

sandeep Shirguppe

Kolhapur Agriculture News : राधानगरी तालुक्यातील धामोड येथे कृषी विभागाच्या वतीने हुमणी किडीचे नियंत्रणासाठी सहा ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर कामगंध सापळे लावले आहेत. पावसानंतर किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे कामगंध सापळे वापरून हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करता येत असल्याने कृषी विभागाने प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग येथे राबविला.

भाजीपाला पीक, फळपीक, कडधान्ये, तेलवर्गीय, डाळवर्गीय, चारा पिके आदींवर हुमणी किडीचा प्रादुर्भाव होतो. हुमणी कीड अंडी, अळी, कोष व भुंगे अशा चार अवस्थेतून जाते. पाऊस पडून गेल्यानंतर पाच ते दहा दिवसांतर भुंगे जमिनीवर येतात. सुप्तावस्थेत असलेले भुंगे सूर्यास्तानंतर २०० प्रकारच्या झाडांवरील पाने खाऊन जगतात. ते पावसाळी किंवा ढगाळ वातावरणात संध्याकाळी सूर्यास्तानंतर बाहेर पडतात आणि त्यानंतर जमिनीत जातात. भुंगा मादी ५० ते ६० अंडी देते.

हुमणी किड्यांना आकर्षित करण्यासाठी सावकाश उत्सर्जित होणाऱ्या गंधाची निर्मिती या सापळ्यामध्ये केली आहे . भुंगे या सापळ्याकडे आकर्षित होतात. सापळ्यात सापडलेले भुंगे नष्ट करता येतात. त्यामुळे परिसरात कृषी विभागाच्या वतीने सहा ठिकाणी कामगंध सापळे लावले आहेत.

हुमणीच्या पजाती

हुमणी अळीच्या भारतामध्ये सुमारे ३०० प्रजातींची नोंद आहे. त्यापैकी महाराष्ट्रात दोन प्रमुख प्रजाती आढळतात.

होलोट्रिकिया सेराटा ः ही अधिक नुकसानकारक असून माळरानावर आढळते.

ल्युकोफोलीस लेपिडोफोरा ः नदीकाठावरील शेतांमध्ये आढळते.

मागील काही वर्षांपासून ऊस पिकामध्ये फायलोग्याथस व अ‍ॅडोरेटस या प्रजाती आढळत आहेत.

पाण्याचा अपव्यय

यंदा कमी पर्जन्यमानामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. हुमणीग्रस्त क्षेत्रास सतत पाणी दिले तर हुमणीचा प्रभाव कमी येतो, असा शेतकऱ्यांचा समज आहे. यामुळे प्रचंड प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. काही दिवसांपासून डुमणीमुळे ऊस पिकाचे नुकसान होऊ लागले आहे. उत्पादन खर्चही मिळणार नाही. कृषी विभागाने हुमणी नियंत्रणासाठी योग्य आणि लवकरात लवकर मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या १७ पैकी ११ जागांसाठी मतदान सुरु, कोण, कुठे रिंगणात? महायुतीचे ६ उमेदवार बिनविरोध

Bovine Breeding Act: गोजातीय प्रजनन अधिनियमाची अंमलबजावणी सुरू

Beed Water Crisis: पाणीबाणीचे सावट; १४ प्रकल्प कोरडेठाक

Dodka Production: दोडका उत्पादनात एकरी तीन ते सहा टन वाढ

Climate Change : आशिया देशांना २०२५ मध्ये हवामान संकटाचा मोठा फटका; उष्णतेच्या लाटा, पूर आणि दुष्काळामुळे वाढले नुकसान

SCROLL FOR NEXT