Food Grains : अन्नधान्यात ११ टक्क्यांची वाढ अपेक्षित

Food Grains Production : प्रतिकूल हवामान, कमी पर्जन्यमानाचा फटका मागील वर्षी शेती क्षेत्राला बसला. एकूण अन्नधान्य उत्पादनात १८ टक्क्यांची घट झाली.
Food Grains
Food GrainsAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : प्रतिकूल हवामान, कमी पर्जन्यमानाचा फटका मागील वर्षी शेती क्षेत्राला बसला. एकूण अन्नधान्य उत्पादनात १८ टक्क्यांची घट झाली. मात्र यंदा त्यात ११ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत व्यक्त करण्यात आला. यंदा कापसाच्या क्षेत्रात पाच टक्क्यांची घट होणार असली तरी उत्पादनात पाच तर उत्पादकतेत १० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली गेली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ३० जूनपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, असे आदेश अधिकाऱ्यांना बैठकीत दिले. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अन्य मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Food Grains
Food Grains Production : आत्मनिर्भर नव्हे आयातनिर्भर

मागील वर्षी अपुऱ्या पर्जन्यमानाचा मोठा फटका अन्नधान्य उत्पादनाला बसल्याचे कृषी विभागाने बैठकीत सांगितले. मागील खरीप हंगामात खरीप ज्वारीच्या क्षेत्रात तब्बल ६१ टक्क्यांची घट झाली असून, उत्पादनात ६७ तर उत्पादकतेत १५ टक्क्यांची घट झाली आहे. प्रचंड गाजावाजा करत तृणधान्य महोत्सव साजरा करूनही बाजरीच्या क्षेत्रात ४५ टक्के घट झाली असून उत्पादनात ६६ घट झाली आहे.

एकूण तृणधान्यांच्या उत्पादनात १६ टक्के घट झाली असून क्षेत्र १२ टक्क्यांनी घटले आहे. यंदा तांदळाच्या क्षेत्रात किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे. ज्वारी १२ टक्के, बाजरी १२ टक्के, नाचणीत १४ टक्के वाढ होईल.

तृणधान्यांची घट मागे पडून त्यात चार टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. एकूण अन्नधान्याखालील क्षेत्र ६ टक्के वाढण्याची शक्यता असून उत्पादनात ११ तर उत्पादकतेत ४ टक्क्यांची वाढ होईल. सोयाबीनचे क्षेत्र ‘जैसे थे’ राहील तर कापसाचे क्षेत्र पाच टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.

Food Grains
Food Grain Storage : शेतमाल वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्याचे फायदे

अतिवृष्टी आणि अन्य आपत्तीच्या काळात सर्व्हे करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे अशा वेळी शेतीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रियस्तरावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. हवामान विभागाने जुलैमध्ये ‘ला निना’मुळे जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. या परिस्थितीत आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

‘‘यंदा खरिपाचे लागवडीखालील अपेक्षित क्षेत्र १४२.३८ लाख हेक्टर राहणार आहे. यामध्ये कापूस पिकाखालील ४०.२० लाख हेक्टर, सोयाबीन पिकाखालील क्षेत्र ५०.८६ लाख हेक्टर राहील,’’ असे प्रधान सचिव व्ही. राधा यांनी सांगितले.

भात पिकाखाली १५.३० लाख हेक्टर, मका ९.८० लाख हेक्टर, तर कडधान्यांचे क्षेत्र १७.७३ लाख हेक्टर राहील. राज्यात २४.९१ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असून १.५० लाख टन युरिया व २५ हजार टन डीएपी खतांचा संरक्षित साठा असल्याची माहितीही राधा यांनी दिली.

भरपाई ३० जूनपर्यंत द्या

राज्यातील शेतकरी, नागरिकांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी.

खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यांवरही कडक कारवाई करावी. ज्या भागात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला, असे तालुके, जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

नेमके पर्जन्यमान किती

भारतीय हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक के. एस. होसाळीकर यांनी संभाव्य पर्जन्यमानाचे सादरीकरण केले. जूनमध्ये ‘अल निना’चा प्रभाव राहिला असला, तरी सरासरीइतका पाऊस होईल, असे ते म्हणाले.

तसेच जुलैमध्येही सरासरीइतका पाऊस पडेल, असेही ते म्हणाले. मात्र सध्या केवळ ७३ टक्के पाऊस पडला असून उर्वरित पाच दिवसांत पावसाच्या शक्यतांबाबत शंका व्यक्त होत आहे. त्यामुळे हवामान विभागाने वर्तविलेले अंदाज नेमके की सध्याची परिस्थिती खरी अशी चर्चा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com