Talathi Transfer : तलाठ्यांच्या बदल्या ऑनलाइन होणार

Revenue Department : महसूल विभागातील तलाठी बदल्यांमधील गैरप्रकार, वशिलेबाजी रोखण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.
Revenue Department
Revenue Department Agrowon

Pune News : महसूल विभागातील तलाठी बदल्यांमधील गैरप्रकार, वशिलेबाजी रोखण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. आता शासनाने तलाठ्यांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी अभ्यास गटाची स्थापना केली आहे.

२०१३ पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयांची पुनर्रचना होऊन एका उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गत एक किंवा दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र निश्चित केले आहे. तलाठी या संवर्गाची आस्थापना उपविभागीय कार्यालयाच्या स्तरावर असून, आस्थापनाविषयक बाबी, बिंदूनामावली, बदली आदींबाबत उपविभागीय अधिकारी स्तरावर कार्यवाही करण्यात येते.

Revenue Department
Talathi Bharti : तलाठी भरतीमधील काही निकाल रोखले

त्यानुसार तलाठ्यांना केवळ एकाच तालुक्यामध्ये पूर्ण सेवा कालावधीमध्ये काम करावे लागत होते. त्यामुळे नावीन्यता व उपक्रमशीलता याचा अभाव दिसत होता. यामुळे राज्य शासनाने तलाठी संवर्गाची आस्थापना जिल्हास्तरावर निश्चित केली आहे. त्यानुसार तलाठी संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी जिल्हाधिकारी आहेत.

बदल्या करताना होणारी वशिलेबाजी, तसेच आपल्या मर्जीतील तलाठ्यांना मोठे गाव देण्याच्या प्रकाराला आळा बसण्यासाठी आता राज्य शासनाने तलाठ्यांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी या अभ्यास गटाची स्थापना केली आहे. अभ्यास गटाला येत्या १५ दिवसांत अहवाल शासनाला सादर करण्याची सूचना दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल विभागाचे कार्यासन अधिकारी शीतल माने यांनी जारी केला आहे.

Revenue Department
Talathi Transfer Order : तलाठ्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने, वशिलेबाजीला बसणार चाप

अभ्यास गटात हे सहभागी

अभ्यास गटाचे अध्यक्ष म्हणून पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती केली आहे. सदस्यपदी नगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महसूल विभागाचे सहसचिव संजय बनकर, अपर जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपजिल्हाधिकारी अभिषेक देशमुख, तर सचिवपदी पुण्याच्या विभागीय उपायुक्तांची नियुक्ती केली आहे.

कोणत्याही तालुक्यात बदली होणार

यापूर्वी तलाठी यांच्या बदलीचे अधिकार हे प्रांताधिकाऱ्यांना होते. त्यामुळे एक किंवा दोन तालुक्यांमध्येच तलाठ्यांची सेवा पूर्ण होऊन तलाठी निवृत्त होत होते. तसेच काही तलाठी वजन वापरून क्रीम पोस्ट मिळवीत होते. याशिवाय अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून चांगल्या गावांची सज्जा मिळवीत होते. सप्टेंबर २०२३ मध्ये तलाठी बदल्यांचे अधिकार हे जिल्हाधिकारी यांना दिले. त्यामुळे आता तलाठ्यांची बदली जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com