Fodder Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Fodder Scarcity : जनावरांना चारा मिळेना, ना उपलब्ध होई पाणी

Water Scarcity : नांदगाव तालुक्यात गत पावसाळ्यात सरासरीच्या अवघ्या ६१ टक्के पाऊस झाला. कमी पर्जन्यमानामुळे जलस्रोतांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : नांदगाव तालुक्यात गत पावसाळ्यात सरासरीच्या अवघ्या ६१ टक्के पाऊस झाला. कमी पर्जन्यमानामुळे जलस्रोतांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. हे चित्र सर्वदूर तालुक्यात आहे. त्यामुळे टँकरवर पाण्याची भिस्त आहे.

ज्यांच्याकडे जनावरे आहेत अशा पशुपालकांची गेल्या तीन महिन्यांपासून चाऱ्यासाठी भटकंती सुरू आहे. डोंगरावर कुरणांमध्ये वाळलेले गवतसुद्धा दिसत नाही. हिरवा चारा दूरच. त्यामुळे जनावरांना ना चारा मिळेना, ना उपलब्ध होई पाणी अशीच दुष्काळी परिस्थिती गंभीर वळणावर आहे.

दुष्काळाचा सामना गेल्या पावसाळ्यापासूनच तालुक्यात कमी अधिक प्रमाणावर करण्याची वेळ आली आहे. कारण ३० जून २०२३ पासून पहिला टँकर झाला. त्यामुळे दिवाळी सणावरही भीषण दुष्काळाच्या झळा दिसून आल्या. तर आता मार्चपासून तालुक्यात दुपारच्या प्रहरी उन्हाचा चटका अधिक असल्याने जीवाची लाही लाही होत आहे.

टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा लोकसंख्या आधारे होत आहे. यामध्ये जनावरांच्या पाण्याची तरतूद नसल्याने जित्राबांचे संगोपन कठीण झाले आहे. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी दुपारी येथील नागरिकांची पायपीट दिसून येते. गावातील पंपावर भांडे ठेवून नंबर लावलेले दिसतात. तर टँकरच्या प्रतीक्षेत अनेक वृद्ध व महिला वाट पाहत असतात.

जिल्ह्यात सर्वाधिक टँकर नांदगावमध्ये

जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली असून सर्वाधिक ६९ टँकर नांदगाव तालुक्यात सुरू आहेत. ६४ गावे व २७६ वाड्यांवर पाणीपुरवठा करून तहान भागविली जात आहे. मात्र या फेऱ्या पुरेशा नसल्याने पण्याची टंचाई आहे. त्यामुळे ६०० ते ८०० रुपयांना खासगी टँकर व ६० रुपयास पाण्याची टाकी विकत घेण्याची वेळ आली आहे.

दुष्काळाची भीषण स्थिती अशी

टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने दुपारी उन्हातही दूरवर पाणी आणण्यासाठी अबालवृद्धांची वणवण दूर अंतरावर जाऊन महागडा चारा विकत घेऊन जनावरे जगवण्याची पशुपालकांवर वेळ सिंचन सुविधा नसल्याने डाळिंब, लिंबू शिवारात वाळून गेल्या शेतमजुरांचे स्थलांतर तर अनेक ठिकाणी शेतमजुरांवर दिवाळीपासून बेरोजगारीची कुऱ्हाड पिके हातातून गेल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक विवंचनेत वाढ

चाऱ्याची वानवा; खरेदीही परवडेना

दरवर्षी उन्हाळ्यात डोंगरावरील कुरणांवर थोडफार गवत, चारा शिल्लक असतो. मात्र यंदा पाऊस अत्यल्प झाल्याने खरिपातील पिके नावापुरती शेतात होती. त्यामुळे जेमतेम चारा होता. तोही संपत आला आहे.

त्यामुळे जित्राब जगविण्याचा संघर्ष वाढला आहे. मात्र चाऱ्याची वानवा असताना तो उपलब्ध असल्याचा अहवाल प्रशासनाकडे गेल्याने चारा छावण्या व डेपोची गरज असताना ती अशा मावळली. शेतकरी १०० किलोमीटर अंतरावरून तसेच मिळेल तिथून चारा विकत घेत आहेत.

तालुक्यात ९० टक्के लोकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने आजही त्यांचे चाऱ्याअभावी प्रचंड हाल होत आहे. तालुक्यात जनावरे वाचविण्यासाठी लोकांची कसरत सुरू आहे, यावर तत्काळ तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करणे आवश्यक आहे.
- बापूसाहेब कवडे, ज्येष्ठ नेते, नांदगाव
१९७२ मध्ये दुष्काळात काही वाटल नव्हतं. विहिरीमध्ये पिण्यासाठी पाणी व हिरवा चारा होता. मात्र यंदा विहिरी कोरड्या पडत आहेत. आता प्यायलासुद्धा पाणी नाही, चारा मिळेना. पिके तर लांबपर्यंत पाहायला मिळेना. असा दुष्काळ गेल्या ६० वर्षांत पाहिला नाही.
- विनायक आहेर, ज्येष्ठ शेतकरी, मांडवड, ता. नांदगाव
नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असतानाही यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे नांदगावचा समावेश दुष्काळग्रस्त घोषित तालुक्यात न झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अनुदानापासून वंचित राहावे लागले, तसेच टंचाई अनुषंगिक उपाययोजना करण्यात प्रशासनाला मर्यादा येत असून आजमितीला चारा डेपो व चारा छावणी सुरू झालेली नाही. आगामी काळात ही शक्यता कमीच आहे, प्रशासनाने विशेष बाब म्हणून चारा छावणी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
- महेंद्र बोरसे, तालुकाध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT