Fodder Shortage : नगर जिल्ह्यात मेच्या मध्यापर्यंतच चारा उपलब्ध

Fodder Scarcity : जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यापर्यंत जनावरांना चारा पुरेल अशी स्थिती आहे. नवीन चारा उपलब्ध व्हायला साधारण जुलै उजाडतो.
Fodder Shortage
Fodder Shortage Agrowon

Nagar News : जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यापर्यंत जनावरांना चारा पुरेल अशी स्थिती आहे. नवीन चारा उपलब्ध व्हायला साधारण जुलै उजाडतो. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस व जून महिन्यात चारा टंचाईशी पशुपालकांना सामना करावा लागणार आहे. नगर जिल्ह्यात सध्याच्या स्थितीला दररोज आठ लाख टन चारा लागतो. सध्या केवळ पंधरा लाख टनापर्यंत चारा आहे.

धरणाच्या लाभक्षेत्रात फारशी चाराटंचाई जाणवणार नाही. मात्र दुष्काळाची तीव्रता असलेल्या तालुक्यात चाराटंचाई निर्माण होण्याची स्थिती पाहून आता पशुसंवर्धन विभागाने मंडळनिहाय चारा उपलब्धता आणि अन्य बाबींचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. नगर जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामातून यंदा ७६ लाख ४६ हजार २२६ टन चारा उपलब्ध झाल्याचा पशुसंवर्धन विभागाचा अहवाल आहे.

Fodder Shortage
Fodder Shortage : सांगलीत १५ लाख टन चारा; टंचाईचे सावट दूर

नगर जिल्ह्यात यंदा सर्वच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे यंदा चारा उपलब्धता कमी झाला आहे. जिल्‍ह्यात गाई-म्हशी, बैलाची लहानमोठी संख्या सोळा लाख आहे. शेळ्या-मेंढ्याची संख्या पंधरा लाखाच्या जवळपास आहे. त्यातील सहा ते सात लाख जनावरे दुभती आहेत. लहान जनावराना दररोज साडेसात किलो, मोठ्या जनावराला पंधरा किलो व शेळी-मेंढीला ३ किलोनुसार दररोज २६ हजार ३६३ टन चारा लागतो.

यंदा खरीप-रब्बीतून तसेच चराई व अन्य भागातून ७६ लाख ४६ हजार २२६ टन चारा मिळाला. पशुसंवर्धन विभागाने केलेल्या आढाव्यानुसार फेब्रुवारी अखेर उपलब्ध चाऱ्यातून ४७ लाख ९९ हजार ९४५ टन चारा वापरात आला. त्यानंतर मार्च व अर्धा एप्रिल संपला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या चाऱ्याचा वापर पाहता सध्या पंधरा लाख टनाएवढाच चारा शिल्लक आहे.

वर्षभर लागणारा चारा आणि उपलब्ध चारा याचा विचार करता २० लाख टन चारा कमी आहे. मे महिन्याच्या मध्यानंतर काही भागात चाराटंचाई भासू शकते. त्या अनुषंगाने आता मंडळनिहाय चारा उपलब्धतेबाबत आढावा घेतला जात आहे. पावसाळा सुरू झाल्यावरही चारा उपलब्ध व्हायला जुलै उजाडतो. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस व जून महिन्यात चारा टंचाईशी पशुपालकांना सामना करावा लागणार आहे.

चाऱ्याचे दर वाढले

नगर जिल्ह्यात हिरवा चारा अपुरा पडत आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या मका, कडवळ, घास व अन्य हिरव्या चाऱ्याचे गेल्या दोन महिन्यात चांगलेच दर वाढले आहेत. जिल्हाभरात दररोज पाच हजार टनापेक्षा अधिक उसाची चाऱ्यासाठी तोड होत आहे. आता उसाचीही कमतरता भासत असल्याचे दिसून येत आहे. सध्या शेतकऱ्यांना दुभत्या जनावरांसह भाकड जनावरे शेतकऱ्यांना सांभाळणे अवघड झाले आहे.

Fodder Shortage
Fodder Shortage : परभणी जिल्ह्यात जूनमध्ये उद्‍भवू शकते चाराटंचाई

हिरव्या चाऱ्यासह अन्य चाऱ्याचे दर गेल्या सहा महिन्यांचा विचार करता ७०० ते १ हजार रुपये प्रतिटन वाढले आहेत. सध्या उसाचा चारा २५०० ते ३००० रुपये, उसाचे वाढे २४०० ते २६००, मका २००० ते २६०० टन, ज्वारीचा कडबा ३ ते चार हजार रुपये शेकडा व घास २३०० (एक हजार पेंढ्या) दराने विकला जात आहे. नगरच्या बाजारात सध्या राहुरी, राहाता, शेवगाव, नेवाशाचा उत्तरेकडील भाग, श्रीगोंदा, कर्जतमधील भीमा पट्ट्यातून चारा विक्रीला येत आहे.

हिरव्या चाऱ्याची मागणी पण...

दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या जामखेड, पाथर्डी, कर्जत, संगमनेरनमधील काही भागात हिरवा चारा मिळेना. जामखेडमधील काही शेतकऱ्यांनी ‘‘आमच्याकडे वाळलेला चारा आहे, मात्र हिरवा चारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केलेली आहे. मात्र शासनाने टंचाई सदृश तालुक्यात करावयाच्या उपाययोजनांत हिरवा चारा पुरवण्याचे कोणतेही प्रायोजन नाही. तसे पशुसंवर्धन विभागाने सबंधितांना कळवले आहे.

नगर जिल्ह्यातील स्थिती

एकूण महसूल मंडळे ः १३१

गावे ः १५९७

लहान-मोठी जनावरे ः १५ लाख ९९ हजार ६५८

शेळ्या-मेंढ्या ः १४ लाख ७९ हजार ८०३

दररोज लागणारा चारा ः २६ हजार ३६३ (टन)

वर्षभरासाठीचा उपलब्ध चारा ः ७६ लाख ४६ हजार २२६ (टन)

फेब्रुवारीअखेर शिल्लक चारा ः २८ लाख ४६ हजार २८१ टन

नगर जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हिरवा चारा कमी पडत आहे. मात्र मध्यंतरी पशुसंवर्धन विभागाने विशेष निधीतून २ कोटी रुपयांची बियाणे वाटली. पाणी असलेल्या भागात चार उत्पादन घेण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे काही प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध होत आहे. चारा कमी पडणार नाही त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे.
- डॉ. सुनील तुंबारे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com