Fodder shortage : नाशकात चाऱ्या टंचाईवरून विरोधाभास? पशुपालकांची चिंता; प्रशासन निर्धास्त

Fodder shortage Nashik : गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने यंदा पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची 'चारा देता का चारा' अशी आवस्था झाली आहे. पण पशूसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात मुबलक चारा असल्याचे म्हटले जात आहे. 
Fodder shortage
Fodder ShortageAgrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या वर्षी पाऊसाने पाठ दाखवल्याने यंदा राज्यातील विविध जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. तर विविध जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची वाटचाल तळ गाठण्याकडे सुरू असून अनेक नद्या कोरड्या पडल्या आहेत. यामुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये देखील चाऱ्यासाठी पशुधन पालकांना वणवण करावी लागत आहे. जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई भासत असून पशुसंवर्धन विभागाकडून मात्र चारा मुबलक आणि मे अखेरपर्यंत पुरेल इतका असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

उन्हाची तीव्रता वाढली 

सध्या जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे पशुधन पालकांना चाऱ्यासाठी वणवण करावी लागत असून 'कोणी चारा देता का चारा' असे म्हणण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना मूरघाससह कडब्यासाठी नातेवाईकांकडे धाव घ्यावी लागत आहे. यातच बाजारात गवत आणि कडब्याच्या जरात चांगचील वाढ झाल्याने शेतकऱ्यांना तेही विकत घेतना कसरत करावी लागत आहे. सध्या नाशिकमध्ये हिरव्या गवताच्या पेंढीसाठी ६ रूपये तर कडब्याच्या ३ किलोच्या भाऱ्यासाठी १० ते १५ रूपये मोजावे लागत आहेत. 

Fodder shortage
Fodder Shortage : जिल्हाबंदीच्या आदेशामुळे शेतकरी संकटात

चाऱ्याच्या वस्तुस्थितीचा अहवाल 

जिल्ह्यातील पशुधन पालकांनी चाऱ्याचा वाढता प्रश्न लक्षात घेऊन जिल्ह्यात चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी केली आहे. जिल्ह्यातील कृषी विभागाकडून पशुसंवर्धन विभागाला चाऱ्याच्या वस्तुस्थितीचा अहवाल पाठवण्यात आलेल्या नसल्याने नाराजीही व्यक्त केली आहे. तसेच अहवालच पाठवण्यात न आल्याने चारा छावण्या उभे करण्यात अडचणी येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

जिल्ह्यात चारा वाहतूक बंदी 

यावर पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे यांनी, 'जिल्ह्यात १५ ब्लॉक असून पशुगणनेनुसार मे महिन्यापर्यंत चारा पुरेल', असे म्हटले आहे. तसेच 'जिल्ह्यात चारा टंचाई होऊ नये म्हणून आधीच चारा वाहतूक बंदी करण्यात आली आहे. मुंबईच्या तबेल्यांना त्र्यबंक, पेट, सटाणा येथून जाणारा चारा थांबण्यात आला आहे. तसेच चारा नेणारी गाडी दिसल्यास ती आडवण्यात यावी असे आदेश पोलीस प्रशासनाला जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत' असेही शिंदे यांनी सांगितले आहे.

मोफत चारा बियाणे 

मे महिन्यानंतर येणाऱ्या चारा टंचाईच्या स्थितीवर प्रशासनाकडून काम केले जात असून जिल्ह्यातील आटलेली धरणे आणि नद्यांच्या पात्रात गाळ पेरा केला जाणार आहे. यासाठी इगतपूरीमध्ये दोन गावांची यादी तयार केली असून १५० हून अधिक शेतकऱ्यांना मोफत चारा बियाणे देण्यात येणार आहेत. ही बियाणे डिपीसी आणि सीएसआरमधून दिली जाणार असून कोरड्या पडलेल्या नदी आणि धरणांच्या पात्रात चारा लागवड करण्यास प्रोस्ताहित करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी आहे. 

Fodder shortage
Maharashtra Fodder Shortage : राज्यात पाण्यासाठी दाही दिशा भटकंती; चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची वणवण, सरकार करतयं तरी काय?

थेट अनुदान

याबरोबरच शिंदे म्हणाले, सध्या जिल्ह्याला पुरेल इतका चारा असून निफाड येथे मुरघास तयार आहे. चारा टंचाई लक्षात घेऊन चारा उत्पादन वाढवण्याकडे लक्ष दिले जात आहे. सध्या येथे २.५ हजार टन चारा असून तो ४ हजार टनापर्यंत वाढवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यात चारा छावण्या सुरू न करता थेट अनुदान पशुधन पालकांच्या खात्यावर देण्याची योजना असून ती लवकरच राबवली जाणार असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली आहे. 

तालुका कृषी अधिकारी 

यादरम्यान जिल्ह्यातील कृषी विभागाकडून पशुसंवर्धन विभागाला चाऱ्याच्या वस्तुस्थितीचा अहवाल पाठवण्यावर तालुका कृषी अधिकारी आर. आर. डमाले यांनी माहिती दिली आहे. त्यांनी मंगळवारपर्यंत (ता. ३०) खरीप व रब्बी हंगामात किती प्रमाणात चारा उपलब्ध झाला याची माहिती पशुसंवर्धन विभागाला पाठवली जाईल असे म्हटले आहे. 

चारा गोडावूनची मागणी

दरम्यान जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे अनेक वेळा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी जिल्ह्यात एखादे धान्य गोडावरून चारा साठवणसाठी प्रशासनाने उपलब्ध केल्यास तेथे मुरघास आणि टिएमआर सारख्या गवताची साठवण करता येते. तर जिल्ह्यातच काय तर राज्यातील इतर जिल्ह्यात चाराटंचाई आल्यास तो चारा पुरवता येतो. यामुळे धान्य गोडावरूनच्या धरतीवर जिल्ह्यात असे चारा गोडावून उभे करावे अशी मागणीही होत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com