Flower Market Agrowon
ॲग्रो विशेष

Flower Market : फुलांचे दर कोमजले; उत्पादकांना फटका

Flower Rate Update : दिवाळीनंतर फुल उत्पादकांचा महत्त्वाचा हंगाम असणाऱ्या मार्गशीर्षमधील लक्ष्मी पूजेसाठीच्या फुलांना चांगला दर मिळावा अशी आशा असते. मात्र, आता आज पहिल्याच गुरुवारी फुलांचे बाजारभाव कोसळल्याने ही अपेक्षा पूर्णतः मावळली आहे.

Team Agrowon

Purandar News : दिवाळीनंतर फुल उत्पादकांचा महत्त्वाचा हंगाम असणाऱ्या मार्गशीर्षमधील लक्ष्मी पूजेसाठीच्या फुलांना चांगला दर मिळावा अशी आशा असते. मात्र, आता आज पहिल्याच गुरुवारी फुलांचे बाजारभाव कोसळल्याने ही अपेक्षा पूर्णतः मावळली आहे. बाजारात मोठी उलाढाल करणाऱ्या व महत्त्वाचे फूल मानले जाणारे झेंडू, शेवंतीवर्गीय फुल उत्पादक शेतकऱ्यांना कमी दराचा फटका बसला. या मुळे मार्गशीर्षमधील लक्ष्मी फुल उत्पादकांवरती रुसल्याचे चित्र बाजारात पाहावयास मिळाले.

मार्गशीर्षनिमित्त गुरुवारी होणाऱ्या लक्ष्मीच्या पूजेसाठी फुलांची मोठ्या प्रमाणावरती मागणी असल्याने फुल उत्पादकांसाठी मार्गशीर्ष महिना हा दसरा, दिवाळी प्रमाणेच महत्त्वाचा हंगाम असतो. या महिन्यातील आज पहिला गुरुवार असल्याने बाजारभाव चांगल्या प्रकारचे होतील असे फुल उत्पादकांना अपेक्षित होते.

मात्र मागील पाच-सहा दिवसांपासून थंडीचे प्रमाण अत्यंत कमी झालेल्याने बाजारात फुलांची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढल्याने कालपासूनच सर्वच फुलांच्या बाजारभाव वरती याचा मोठा परिणाम झाला. आज पुणे येथील गुलटेकडी बाजारात शेवंतीवर्गीय पौर्णिमा फुले, शंका व्हाईट या फुलांची मोठी आवक पाहावयास मिळाली. त्याचप्रमाणे झेंडूच्या फुलांची देखील मोठी आवक मागील काही दिवसांपासून होत असल्याने झेंडू फुलांचे बाजारभाव देखील मातीमोल किमतीत आज बाजारात पाहावयास मिळाले.

पोर्णिमा पांढरी व पिवळी शेवंती आज बाजारामध्ये वीस रुपयांपासून ५० रुपये प्रति किलो एवढ्या कमी दराने विकली गेली. तर झेंडूची फुले दहा ते वीस रुपये एवढ्या कमी दराने विकली गेली. मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले आज न खपता तशीच पडून होती. झेंडू उत्पादकांचा तोडणी व बाजारात विक्रीसाठी आणण्याचा वाहतूक खर्च देखील यामुळे निघत नसल्याचे चित्र बाजारात पाहावयास मिळाले. बाजारात कापरी, बिजली ही फुले देखील ५० रुपयांच्या आसपास विकली गेली. तर फक्त अस्टर फुले अत्यंत कमी प्रमाणात आवक असल्याने ७० ते ८० रुपये किलोपर्यंत विकली गेली.

गतवर्षी चांगला दर मिळाल्याने यंदा ऑगस्ट महिन्यामध्ये शेवंती वर्गीय फुलांच्या लागवडी केल्या. फुल उत्पादन परिसरामध्ये पावसाने उघडीप दिल्याने लागवड केलेले बहुतांश फुलांचे फड चांगल्या प्रकारे आले. यामुळे बाजारात फुलांची मोठी आवक होत आहे. मार्गशीर्ष महिन्यात बाजारभाव वाढतील की नाही या बाबत शंका आहे.
रामदास वाघले, फुल उत्पादक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: भेंडीला वाढली मागणी; संत्रा दर दबावातच, लिंबुची आवक कमीच, लसणाचे दर टिकून तर बेदाणा दर तेजीत

PM Kisan Yojana : तीन राज्यांतील शेतकऱ्यांना मिळाला पीएम किसानचा २१ वा हप्ता; उर्वरित राज्यांत कधी येणार पैसे; महत्त्वाची अपडेट

Soybean Crop Damage : सात दिवसांपासून सोयाबीन पाण्याखाली

Crop Harvesting : कोल्हापूर जिल्ह्यात पावसामुळे खरीप पीक काढणी ठप्प

Sangli Rainfall : सांगलीत जोर मंदावला

SCROLL FOR NEXT