Flower Market : फुलांच्या आकर्षक हारांसाठी प्रसिध्द सुपे बाजार

Flower Garlands : पुणे-अहिल्यानगर रस्‍त्यावरील सुपा (ता. पारनेर) गाव फुलांच्या आकर्षक हारांच्या निर्मितीसाठी राज्यात ओळखले जात आहे. पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळापासून गावाने ही परंपरा जोपासली आहे.
Flower Market
Flower MarketAgrowon
Published on
Updated on

Flower Garlands Market : पुणे शहरापासून अहिल्यानगर, छ. संभाजीनगर व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जाण्यासाठी असलेल्या महामार्गावर सुपा (ता. पारनेर. जि. अहिल्यानगर) गाव लागते. दुष्काळी परिसर असलेल्या सुपा परिसरातील गावे फुलांचे अनेक वर्षांपासून उत्पादन घेतात. आपल्या भागात फुले उपलब्ध होत असल्याने सुपा येथे शेख हुसेन हसन यांनी १९६० च्या सुमारास स्थानिक पातळीवर फुलांची खरेदी करून छोटे हार तयार करून त्यांचा विक्री व्यवसाय सुरू केला.

त्याच काळात संभाजी रोकडे यांनीही याच व्यवसायाला सुरवात केली. फुलांना चांगला प्रतिसाद मिळू लागल्यानंतर टप्प्याटप्प्याने इतरांनीही हा व्यवसाय सुरु केला. कालांतराने वाहनांची संख्या वाढली. पुणे- अहिल्यानगर मार्गावरील वाढत्या वर्दळीने हारांना मागणी वाढू लागली. आजमितीला सुपा येथे २० पेक्षा अधिक फूल हार व्यावसायिकांची दुकाने पाहायला मिळतात. सणांच्या काळात ही संख्या अजून वाढलेली असते.

Flower Market
Floriculture : फूलशेतीत सामूहिक शेतीचा पॅटर्न राबविण्याची गरज

अशी आहे फुलांची बाजारपेठ

सुपे गावावरून जाणारा कोणताही वाहनचालक हार खरेदी करत नाही असे शक्यतो होत नाही. मोठा, आकर्षक, ‘सिंगल’, ‘गड्डु’, रोणगा या प्रकारच्या हारांना मागणी अधिक असते. शंभर रुपयांपासून ते एकहजारांपर्यत त्यांची किंमत असते. केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळेसही ही दुकाने सुरुच असतात. सण, लग्न, राजकीय- खासगी समारंभ, सत्कार सोहळे आदींच्या माध्यमातून दिवसभरात सुमारे एक ते दीड हजार हारांची विक्री व त्यातून काही लाखांची उलाढाल होते.

अलीकडील काळात नेते, सामाजिक कार्यकर्त्यांना ‘जेसीबी’ यंत्राच्या साह्याने मोठे हार घालण्याचे नवे ‘फॅड’ आले आहे. असे हार सुप्यात आगाऊ मागणीनुसार तयार केले जातात. अहिल्यानगरसह पुणे, सोलापूर, नाशिक, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोलीसह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रापर्यत येथून हार नेले जातात.

फुलांची खरेदी

सुपा परिसरातील वाळवणे, हंगा, रायतळे, सोनेवाडी, अकोळनेर तर अहिल्यानगर, पारनेर भागातील अनेक गावे फूलशेतीसाठी प्रसिद्ध आहेत. मर्यादित पाण्यावर झेंडू, जरबेरा, गुलाब, शेवंती, ॲस्टर, लिली, गुलछडी आदी विविध प्रकारची फुले या गावातील शेतकरी फुलवतात. पारनेर, राहाता, राहुरी, संगमनेर भागातही फुलांचे उत्पादन घेणारे शेतकरी आहेत.

Flower Market
Floriculture : संकटांमधून सावरत फुलवले फुलशेतीतून सुखाचे रंग

अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत फुलांची अहिल्यानगर, मराठवाड्यातून आवक होत असते. सुप्यातील व्यावसायिक स्थानिक शेतकऱ्यांसह तसेच गरजेनुसार या बाजार समितीतूनही फुलांची खरेदी करतात. दर दिवशी ही खरेदी दोन ते तीन टनांपर्यंत होते. गणेश उत्सव, दसरा, दिवाळीत ती पाच ते दहा टनांपर्यंतही जाते. उन्हाळ्यात फुलांची आवकही घटते. अशावेळी फूल हार विक्रेते फूल व्यापाऱ्यांकडे आगावू नोंदणी करतात.

रोजगार उपलब्ध

अलीकडील वर्षांत हारांना वाढलेली मागणी पाहता सुप्यातील २० हून अधिक दुकानांमधून शंभरपेक्षा अधिक मजुरांना रोजगार मिळाला आहे. प्रति हारानुसार दर दिवशी पाचशे रुपयांपेक्षा अधिक मजुरी मिळते. सणांच्या काळात दुकानांची संख्या पन्नासपेक्षा अधिक असते. या काळात मजुरांची संख्याही अधिक असते. अनेक वर्ष मजुरीचा अनुभव घेतलेल्यांनी कालांतराने स्वतःच हा व्यवसाय सुरु केला आहे.

पाचशे किलोपर्यतचा हार

सुपा येथील तरुण फूल हार विक्रेते बाळू अवचित म्हणाले की मोठे व आकर्षक हार तयार करण्याची कला आम्ही अवगत केली आहे. पाचशे किलो वजनापर्यतचाही हार येथे तयार होतो. असे हार चांगले चर्चेत असतात व त्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत किंमत मिळते. अनेक व्यावसायिकांची तिसरी पिढी या व्यवसायात आता कार्यरत आहे.

‘माझ्या वडिलांनी ५० वर्षापूर्वी फुलांच्या हारांचा व्यवसाय सुरु केला. सध्या आमची तिसरी पिढी या व्यवसायात कार्यरत आहे. व्यवसायाने अनेक कुटुंबांना आर्थिक ला स्थैर्य व रोजगार दिला आहे. राज्यभरातून मागणी असल्याने आमचे सुपा गाव फूल हार विक्रीचे राज्यातील प्रमुख केंद्र झाले आहे.
शेख नसीर हुसेन ८७९६४०८९८९
फुलांपासून हार निर्मितीचा व्यवसाय कमी भांडवलात सुरु करता येण्यासारखा आहे. मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी पाचशे किलोपेक्षा अधिक वजनी हार मी आगाऊ मागणीनुसार तयार करून पुरवला होता.
सरफराज खान ८७९६९८५५५१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Agrowon
agrowon.esakal.com