Flower Market : सणांमुळे झेंडूची मागणी वाढली; दर प्रतिकिलो १०० ते २०० रुपये

Marigold Flower Rate : दसरा, दिवाळीच्या काळात मातीमोल दराने विकाव्या लागणाऱ्या झेंडूच्या फुलांना यंदा पहिल्यांदाच चांगला दर मिळाला.
Marigold Flower
Marigold FlowerAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : दसरा, दिवाळीच्या काळात मातीमोल दराने विकाव्या लागणाऱ्या झेंडूच्या फुलांना यंदा पहिल्यांदाच चांगला दर मिळाला. अहिल्यानगर शहरासह जिल्हाभरातील बाजारांत यंदा दसऱ्याला झेंडू शंभर ते दोनशे रुपये किलोपर्यंत विकला गेला. ॲस्टर, शेवंती, पिवळी शेवंती, यासह अन्य फुलांचे दरही तेजीत होते.

Marigold Flower
Marigold Harvesting : दसऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर झेंडू काढणीस वेग

अहिल्यानगर तालुक्यासह राहाता, राहुरी, कोपरगाव, संगमनेर, अकोले भागांतही फुलांच्या शेतीला शेतकरी प्राधान्य देतात. ॲस्टर, शेवंती, गुलाब व अन्य फुलांना चांगला दर असतो. मात्र झेंडुंच्या फुलांना दर बहुतांशवेळा कवडीमोल असतो. गतवर्षी दसऱ्याला अहिल्यानगरमध्ये झेंडू केवळ वीस रुपये किलोने विकला जात होता.

Marigold Flower
Marigold Flower Rate : झेंडूसह विविध फुलांच्या दरांत वाढ

यंदा पहिल्यांदाच झेंडुची दरस्थिती चांगली आहे. श्रावणात झेंडू किरकोळ बाजारात ६० ते ९० रुपये किलोने विकला गेला. तीन महिन्यांपासून झेंडूचे दर टिकून आहेत. नवरात्रोत्सवात मागील दोन महिन्यांत मिळणाऱ्या दरापेक्षाही अधिक दर झेंडूला मिळाला. झेंडूला सरासरी दीडशे रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. काही ठिकाणी दोनशे रुपयांपर्यंत दर होता. शेवंती, ॲस्टरला तर किलोला तीनशे रुपयांपर्यंत दर मिळाला.

यावर्षी झेंडूला चांगला भाव मिळाल्याने झालेला खर्च आणि मिळालेले पैसे याचा ताळमेळ बसत थोडाफार नफा झाला. गेली दोन-तीन वर्षे चांगला भाव मिळत नसल्याने फुलांची लागवड करण्यासाठी मन धजावत नव्हते, मात्र शेवटचा भाग म्हणून ३० गुंठे क्षेत्रात झेंडू लावला होता, त्यातून चांगले उत्पन्न मिळाले.
बाळासाहेब सपकाळ, शेतकरी, टाकळी खंडेश्‍वरी, ता. कर्जत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com