Agricultural Financial Assistance Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Financial Assistance : पश्चिम विदर्भातील वीस लाख शेतकऱ्यांना अर्थसहाय्य

Team Agrowon

Amravati News : २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत अर्थसाह्य देण्यात येणार आहे. ई-पीकपाहणी नोंद असलेले शेतकरी या अर्थसाह्यासाठी पात्र ठरणार असून विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या बॅंक खात्यात ते थेट जमा करण्यात येणार आहे. पश्चिम विदर्भातील सुमारे वीस लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांनी भाव पडल्याने सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने भावांतर योजनेअंतर्गत अर्थसाह्य करण्याचा निर्णय २९ जुलैला घोषित केला.

त्यासाठी ई-पीक नोंदणी असलेले शेतकरी पात्र ठरविण्यात आले आहेत. वीस गुंठे असलेल्या शेतकऱ्यांना एक हजार रुपये तर एक ते दोन हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळणार आहे. पश्चिम विदर्भातील १४ लाख सोयाबीन व सहा लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात हा लाभ निवडणुकीपूर्वी डीबीटीने पडणार आहे.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील १४ लाख १७ हजार ७३८ सोयाबीन उत्पादक व ६ लाख ९ हजार ६९२ कापूस उत्पादक शेतकरी यासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये वैयक्तिक व सामूहिक, अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांनी संमतिपत्र आणि सामूहिक खातेदारांनी ना हरकत सादर करण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी केले आहे.

पश्चिम विदर्भातील लाभार्थी

सोयाबीन उत्पादक (सामूहिक)

बुलडाणा ३,७९,४७५ (९०,००१)

अकोला १,७१,४०१ (४२,४९७)

वाशीम २,४०,२६१ (५६,१९२)

अमरावती १,५१,४९७ (४४,४०५)

यवतमाळ १,८८,१२१ (५३,८८८)

कापूस उत्पादक (सामूहिक)

बुलडाणा १,३४,४७१ (२८,०४६)

अकोला ६५,८९७ (१७,११६)

वाशीम १७,३७२ (३४१२)

अमरावती १,०९,३४२ (३९,६४५)

यवतमाळ २,२५,७०८ (७७,५८९)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Sowing : हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार

Pesticide residues found in farmer's urine : धक्कादायक! तेलंगणाच्या काही शेतकऱ्यांच्या लघवीत कीटकनाशकांचे अंश?

Agriculture Department : कृषी कार्यालयाचा कारभार कुबड्यांवर

Hilsa Fish Export : बांगलादेशने हिलसा माशाच्या निर्यातीवरील बंदी उठवली; भारतला ३ हजार टन मासा करणार निर्यात

Irrigation Subsidy : सिंचन अनुदानाच्या वाटपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच

SCROLL FOR NEXT