Cabinet Meeting Decision : कापूस आणि सोयबिन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ४ हजार कोटी रुपयांची तरतूदीची घोषणा

State Cabinet Meeting Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शनिवार (ता. १६) विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
Cabinet Meetings
Cabinet MeetingsAgrowon

Pune News : लोकसभा निवडणुकापुर्वी राज्यासह देशात आचारसंहिता लागू होऊ शकते. याबाबत शनिवारी (ता.१६) निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकणीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मंत्रिमंडळ बैठकीत विविध निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दिपक केसरकर उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी, कापूस आणि सोयबिन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला असून कापूस आणि सोयबिनसाठी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ४ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केली. राज्य सरकारने केलेल्या या घोषणेचा सोयाबिन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तात्पुरत्या स्वरूपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमितीकरण, संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापण, शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण, राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच आता पर्यंत नियमांच्या बाहेर जाऊन तिपट्ट मदत करण्यात आली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना विविध योजना आणि पिक विमातून ४५ हजार कोटी रूपयांची मदत केल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शनिवार (ता. १६) घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय

१) राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी

(उद्योग विभाग)

२) तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार

(वैद्यकीय शिक्षण विभाग)

Cabinet Meetings
Cabinet Meetings : यंत्रमागांना अतिरिक्त वीज सलवत लागू; लघुदाब उपसा जलसिंचन ग्राहकांसाठीही मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

महत्त्वपूर्ण निर्णय

३) मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला

(गृह विभाग)

४) १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.

(विधि व न्याय)

५) संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार

(सांस्कृतिक कार्य)

महत्त्वपूर्ण निर्णय

६) शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण

(सांस्कृतिक कार्य)

७) विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल

(इतर मागास)

८) पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.

(पशुसंवर्धन विभाग)

महत्त्वपूर्ण निर्णय

९) हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली "मॅनहोलकडून मशीनहोल" कडे योजना

(सामाजिक न्याय विभाग)

१०) संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार

(गृह विभाग)

११) राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार

(गृह विभाग)

१२) ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन. तर ५० कोटींचे अनुदान

(परिवहन विभाग)

Cabinet Meetings
Cabinet Meeting : बांबू लागवडीस अनुदान तर संपूर्ण राज्यात राबवणार मधाचे गाव योजना; मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

महत्त्वपूर्ण निर्णय

१३) भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप

(महसूल विभाग)

१४) संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार

(गृह विभाग)

१५) वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन

(सांस्कृतिक कार्य)

महत्त्वपूर्ण निर्णय

१६) राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी 20 कोटी अतिरिक्त निधी मंजूर

(सामान्य प्रशासन विभाग)

१७) श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

(महसूल व वन)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com