Financial Assistance To Farmers : अवकाळी, गारपिटीग्रस्तांच्या मदत निधीला अखेर मुहूर्त; प्रति हेक्टरी मिळणार अर्थसाहाय्य

farmers affected by unseasonal Rain & hailstorm : नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी आणि गारपिट झाली होती. त्यामुळे १२ लाख ८७ लाख १४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे आता समोर आले आहे. तर २३ लाख ९० हजार ५७१ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Financial Assistance To Farmers
Financial Assistance To FarmersAgrowon
Published on
Updated on

Pune News : नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अवकाळी आणि गारपिटीने राज्यातील १२ लाख ८७ लाख १४५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून २३ लाख ९० हजार ५७१ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे निकषांच्या बाहेर मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार महसूल व वन विभागाने सोमवारी (ता.१) शासन निर्णय काढला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीतील निर्णयानंतर हा आदेश काढण्यात आला आहे.

शासनाने काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून जिरायती पिकास प्रति हेक्टरी १३ हजार रूपये देण्यात येणार आहेत. तर शासनाने जाहीर केलेली ही मदत तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. राज्यात नैसर्गित आपत्तीमुळे नुकसन झालेल्या शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीतून (NDRF) मदत दिली जाते. ज्यात केंद्र सरकारचा ७५ टक्के आणि राज्य सरकारचा २५ टक्के वाटा असतो.

Financial Assistance To Farmers
Mango Season : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा उत्पादक संकटात

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात वेगवेगळ्या नैसर्गित आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसन झाले होते. त्यावेळी शेतपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. तेंव्हा राज्य शासनाने आपत्ती प्रतिसादाच्या निकषांच्या बाहेर जाऊन मदत केली जाईल अशी घोषणा केली होती. त्याप्रमाणे १९ डिसेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महसूल व वन विभागाने शासन निर्णय काढत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे.

Financial Assistance To Farmers
Unseasonal Rain Problems : अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या रोगसमस्या, उपाययोजना

दोन हेक्टरची मर्यादा

नैसर्गित आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्याला आपत्ती प्रतिसादाच्या निकषांनुसार मदत दिली जात होती. ही मदत दोन हेक्टरपर्यंत दिली जात होती. आता या निकषात बदल करण्यात आला आहे. आता ही मदत तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे.

जिरायती, बागायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी

या शासन निर्णयात जिरायती, बागायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी वेगवेगळी मदत देण्यात आली आहे. जिरायती पिकास प्रति हेक्टरी १३,६०० रूपये, बागायतीस प्रति हेक्टरी २७ हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टरी ३६ हजार रूपये अशी तरतूद करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com