Lumpy Skin Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Skin Disease : घोडेगाव परिसरात शेतकऱ्यांना ‘लम्पी स्कीन’ची धास्ती

Lumpy Skin Update : लम्पी स्कीनमुळे जनावरांच्या शरीराला गाठी येतात. पुढे त्या गाठींचा आकार मोठा होतो.

Team Agrowon

Pune News : घोडेगाव (ता. आंबेगाव) परिसरातील जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’सदृश लक्षणे आढळून आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुष्काळाचे सावट असताना आता लम्पी स्कीन आजाराचे नवे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे.

घोडेगाव परिसरातील गावांमध्ये दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. सध्या पसरत असलेल्या आजाराचा थेट दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. लम्पी स्कीनमुळे जनावरांच्या शरीराला गाठी येतात. पुढे त्या गाठींचा आकार मोठा होतो.

हा आजार जास्त वेगाने दुसऱ्या जनावरांमध्ये संक्रमित होत असून, त्याच्या लक्षणांमध्ये प्रथम जनावरांना ताप येतो, त्यांचे वजन कमी होते. जनावरांच्या डोळ्यातून चिकट पाणी टपकते. तोंडातून लाळ पडते, शरीरावर छोट्या गाठी येतात. यामुळे जनावरे अधिक आजारी पडतात.

घोडेगाव परिसरातील भवानी माळ, जायझुरी, परांडा, पानमळा, भगतवाडी येथील जनावरे लम्पी स्कीनच्या प्रादुर्भावाने बाधित झाली आहेत. ग्रामस्थांनी सांगितलेल्या माहितीनुसार, संदीप काळे, नीलेश काळे, मनीष काळे, गोविंद काळे आदी शेतकऱ्यांची जनावरे लम्पीने बाधित झाली आहेत. संबंधित ठिकाणी व आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांवर लसीकरण न झाल्यास या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

लम्पी स्कीनची लक्षणे आढळून आल्यानंतर एक महिन्यापूर्वीच तालुक्यात जनावरांचे लसीकरण केले आहे. ७० हजारांहून अधिक लहान व मोठ्या जनावरांचे लसीकरण झाले आहे. डासांमुळे लम्पीचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे ग्रामपंचायतींनाही डासांवर उपाय म्हणून फवारणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
- पी. डी. साळवे, पशुधन विकास अधिकारी, ता. आंबेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT