Lumpy Skin : पशुधनाच्या जीवावर उठलेला ‘लम्पी’ येतोय आटोक्यात

Lumpy Skin Infection : सध्या केवळ १० हजार ६८४ जनावरे बाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तीही आता धोक्याबाहेर आहेत.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon
Published on
Updated on

Solapur News : राज्यातील गायवर्गीय पशुधनाच्या जीवावर उठलेला लम्पी स्कीन आजार आटोक्यात येत असून, राज्यात आतापर्यंत बाधित झालेल्या एकूण १ लाख ३८ हजार ८०९ जनावरांपैकी १ लाख १८ हजार ५२२ जनावरे बरी झाली आहेत. सध्या केवळ १० हजार ६८४ जनावरे बाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तीही आता धोक्याबाहेर आहेत. त्यामुळे पशुपालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील जवळपास २८ जिल्ह्यांतील २८७ तालुक्यांत लम्पीने पाय पसरवले आहेत. पशुसंवर्धन विभागाने आतापर्यंत लम्पीला प्रतिबंध करणाऱ्या डोसच्या मात्रा जनावरांना दिल्या आहेत. तसेच वेळीच उपचार होत आहेत. त्यामुळे जनावरे बाधित होण्याचे प्रमाण कमी-कमी होत आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : नगर जिल्ह्यात ‘लम्पी’चा प्रादुर्भाव सुरूच

गेल्यावर्षी बाधित जनावरांची संख्या तब्बल ४ लाख ८० हजारांपर्यंत होती. पण यंदा मार्चपासून ही संख्या केवळ १ लाख ३८ हजारापर्यंत खाली आली आहे. त्यापैकीही जवळपास ९०-९२ टक्केपर्यंत जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. पूर्वी प्रतिदिन जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण ४०० पर्यंत होते, ते गेल्या काही महिन्यात १२५ वर आले, आता तर ते फक्त २० ते ३० पर्यंत खाली आले आहे.

लम्पीवर नियंत्रणासाठी प्रत्येक जिल्ह्यात अगदी तालुकास्तरापर्यंत जनावरांच्या उपचारासाठी ३०८८ इपिसेंटर्स (संसर्ग केंद्रे) उघडण्यात आली आहेत. त्याशिवाय लसीकरणाची मोहीमही वेगाने सुरू आहे. राज्यात एकूण १ कोटी ३९ लाख ९२ हजार ३०४ गायवर्गीय जनावरे आहेत.

त्यापैकी १ कोटी ३९ लाख १० हजार ८१० जनावरांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. परंतु मधल्या काळात पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा लम्पीने डोके वर काढल्याने पशुपालकांची चिंता वाढली. पण आता मात्र परिस्थिती काहीशी नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease : ‘लम्पी स्कीन’ हद्दपार, प्रतिबंध कायम गो-पालक आर्थिक संकटात

बाधितांची संख्या ओसरली

राज्यात सध्या जळगावला -४२३ बाधित आहेत. तर नगर- ७४९, धुळे-११२, अकोला-१४, पुणे-१२४, लातूर- ६४२, छत्रपती संभाजीनगर-३१८, बीड- ५४५, सातारा- ४९, बुलडाणा- ५, अमरावती- ४३, धाराशिव- ३६९, कोल्हापूर-३११, सांगली- ७००, यवतमाळ- ६०६, परभणी- ४३०, सोलापूर- ७०७, वाशीम- ३१७, नाशिक- ८५३, जालना- ३४०, नांदेड- ३९३, नागपूर- ४६३, चंद्रपूर- ८, हिंगोली- ५७०, नंदुरबार- ४९७, वर्धा- ३५७, रत्नागिरी- ६४१, सिंधुदुर्ग-९८ अशा २८ जिल्ह्यात १० हजार ६८४ जनावरे बाधित आहेत. काही ठरावीक जिल्हे वगळता इतरठिकाणी बाधित जनावरांची संख्या कमी-कमी होत आहे.

वेळेत आणि नेमके उपचार होत असल्याने तसेच लसीकरणही जवळपास शंभर टक्के झाल्याने राज्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. जनावरे बरी होण्याचा कालावधीही दोन-तीन दिवसांवर आला आहे. पण संपूर्णपणे लम्पी जाईल, असे नाही, त्याचा प्रादुर्भाव अगदीच नगण्य दिसेल.
-डॉ. देवेंद्र जाधव, उपआयुक्त पशुसंवर्धन (रोगनियंत्रण विभाग), पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com