Lumpy Skin : लम्पी स्कीन आजार अजूनही खानदेशात अस्तित्वात

Lumpy Skin Vaccination : पशुधनासाठी मागील चार ते पाच महिने लम्पी स्कीन आजाराने खडतर राहिले. खानदेशात मोठी हानी यात झाली. परंतु प्रशासन आता हा आजार पशुधनातून निघून गेल्याचा आव आणत आहे.
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon

Jalgaon News : पशुधनासाठी मागील चार ते पाच महिने लम्पी स्कीन आजाराने खडतर राहिले. खानदेशात मोठी हानी यात झाली. परंतु प्रशासन आता हा आजार पशुधनातून निघून गेल्याचा आव आणत आहे. त्यासंबंधी दुर्लक्ष करीत असून सर्वेक्षणही बंद आहे.

काही भागांत पशुधन या आजाराने आजारी आहे. त्यावर उपचारासंबंधी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. शासकीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांची खासगी पशुवैद्यकांच्या मदतीने ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत मोठी लूट झाली. उपचारासंबंधी खर्च करावा लागला आहे. पशुपालक शेतकरी अजूनही चिंतेत आहेत.

Lumpy Skin
Lumpy Skin : नगर जिल्ह्यात ‘लम्पी’चा प्रादुर्भाव सुरूच

कारण काही भागांत हा आजार अस्तित्वात आहे. प्रतिबंधात्मक लसीकरण अनेक भागांत झाले. पण लसीकरणानंतरही हा आजार आला. याबाबत काही महिन्यांपूर्वी नव्या लशीचा शोध केंद्रीय संशोधन संस्थांनी लावला होता. ही लस शासनाने उपलब्ध करून पुन्हा लसीकरण करावे, करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

पशुधनात लम्पी स्कीन आजार कमी दिसत असला तरी तो कायम आहे. कोविडसारखा हा आजारही पुढे वाढू शकतो. जगात कोविडच्या जशा तीन-चार लाटा आल्या. चीनमध्ये हा आजार पुन्हा आल्याने संकट उभे राहीले आहे. असाच लम्पी स्कीनदेखील आहे. हा आजार कायम आहे.

त्यामुळे सध्या पशुधनाची हानी दिसत नसली, तरी प्रतिबंधात्मक कार्यवाही करायला हवी. गोठ्यांची स्वच्छता मोहीम काही दिवस सुरू होती. त्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले. पण नंतर ही मोहीम बंद झाली. फक्त कागदावर काम न करता प्रत्यक्षात सर्वेक्षण व आजार याबाबत प्रशासन किंवा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने काम करायला हवे.

Lumpy Skin
Lumpy Skin : पशुधनाच्या जीवावर उठलेला ‘लम्पी’ येतोय आटोक्यात

दुधाळ पशुधनास संसर्ग झाल्यास दूध उत्पादन घटते. काही वेळा गायी वा म्हशीचा गर्भपात होऊन प्रजनन क्षमता घटते. लम्पी स्कीन आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी लक्षणे असलेल्या जनावरांना वेगळे करावे. यासाठी जनजागृती करण्यात यावी हवे. कारण कुणी गाफील राहायला नको.

पशुसंवर्धन विभागाने याबाबत कार्यवाही करावी. जळगाव, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, रावेर, चोपडा, मुक्ताईनगरात मोठा उद्रेक झाला होता. या सर्वच भागांत जनजागृती, सर्वेक्षण करण्याचा मुद्दा जिल्हा परिषदेचे सदस्य व इतर ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com