KVK Scientist Sachin Digras Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Sanvad : रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करावा

KVK Scientist Sachin Digras : प्रतिकूल स्थितीत पिकाला अनुकूलता निर्माण करण्यासाठी हे तंत्र फायद्याचे ठरले आहे, असे मत मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सचिन डिग्रसे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Latur News : सोयाबीन आपल्या जिल्ह्याचे महत्त्वाचे पीक आहे. या पिकाला पावसाचे खंड अति पाऊस आदींचा फटका बसू नये यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करावा. प्रतिकूल स्थितीत पिकाला अनुकूलता निर्माण करण्यासाठी हे तंत्र फायद्याचे ठरले आहे, असे मत मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सचिन डिग्रसे यांनी व्यक्त केले.

‘ॲग्रोवन’च्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त ॲग्रोवन आणि फार्मरिच प्रोड्यूसर कं. लि. करडखेल, ता. उदगीर, जि. लातूर यांच्या वतीने ‘पाणी बचत काळाची गरज’ या विषयावर शनिवारी (ता. २०) हेर येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

त्यावेळी डॉ. डिग्रसे मार्गदर्शन करीत होते. डॉ. डिग्रसे म्हणाले, की आपल्या भागामध्ये सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु एकरी उत्पादन मात्र कमी आहे, एकरी उत्पादन वाढीसाठी माती बीज प्रक्रिया व शिफारशीप्रमाणे खतांचा वापर करावा. फार्मरिच प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष रमेश चिल्ले म्हणाले, पाणीटंचाईच्या काळात पिके वाचवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे शेततळे असावे.

शेतकऱ्यांनी अधिक पाणी लागणारी पिके नघेता कमी पाण्यावरील पिके घ्यावीत. पावसाचे पाणी शेतातून वाहून न जाता जमिनीत मुरविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जल पुनर्पभरन, बांधबंधिस्ती करून जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावा,

असे आवाहन केले. यावेळी राजेंद्र मिटकरी, बालाजी तवंडे, शिवाजी वजीरे, प्रणव चिल्ले, शिवलिंग मिटकरी, रवींद्र रासुरे, अनंत ढगे, महादेव मिटकरी, परमेश्वर धोत्रे, तानाजी सूर्यकर आदी शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास कांबळे यांनी प्रयत्न केले. ॲग्रोवनच्या वितरण विभागाचे बालाजी थोडसरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT